IND vs SL: जसप्रीत बुमराहला ‘या’ खेळाडूने मैदानातच देऊ केली लाच, नेमकं काय आहे प्रकरण?
टीम इंडियाने काल श्रीलंकेविरुद्धचा (India vs Srilanka) पहिला टी 20 सामना जिंकला. रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने श्रीलंकेला 62 धावांनी हरवलं.
लखनौ: टीम इंडियाने काल श्रीलंकेविरुद्धचा (India vs Srilanka) पहिला टी 20 सामना जिंकला. रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने श्रीलंकेला 62 धावांनी हरवलं. या सामन्यात भारताने आपले सात गोलंदाज वापरले. सामन्यानंतर भारताच्या एका फलंदाजाने त्याला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करायची होती, असं सांगितलं. त्यासाठी त्याने टीमचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) लाच देखील देऊ केली. पण त्याचा फायदा झाला नाही. या खेळाडूचं नाव आहे श्रेयस अय्यर. बुमराह शिवाय भारताने भुवनेश्वर कुमार, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि दीपक हुड्डा यांना गोलंदाजी देऊन पाहिली. या सगळ्यांनी मिळून श्रीलंकेच्या सहा विकेट काढल्या. भारताने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारीत 20 षटकात फक्त 137 धावाच केल्या.
श्रेयस अय्यरला करायची होती गोलंदाजी
श्रेयस अय्यरला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करायची होती. त्यासाठी तो बुमराहशी सुद्धा बोलला. पण त्याला गोलंदाजीची संधी नाही मिळाली. “मी 16 व्या षटकादरम्यान गोलंदाजी करण्यासाठी हाथ वर उचलला होता. त्यावेळी रोहितने बुमराहला हे गोलंदाज गोलंदाजी करणार असं सांगितलं होतं, मी बुमराहला लाच देण्याचाही प्रयत्न केला. पण त्याचा फायदा झाला नाही” दक्षिण आफ्रिका दौऱ्यात श्रेयस अय्यरला सहावा गोलंदाज म्हणून एका सामन्यात संधी दिली होती.
भारताचा सहज विजय
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेने सुरु झालेली भारताची विजयी मालिका श्रीलंकेविरुद्धच्यासीरीजमध्येही कायम आहे. आज लखनऊनमध्ये झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी सहज विजय मिळवला. भारताने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने निर्धारीत 20 षटकात सहाबाद 137 धावा केल्या. इशान किशन (89), श्रेयस अय्यर नाबाद (57) आणि कर्णधार रोहित शर्मा 44) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची खूपच खराब सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर भुवनेश्व कुमराने सलामीवीर पथुम निसांकाला शून्यावर बाद केलं. त्यानंतर भुवनेश्वर कुमारनेच दुसरा सलामीवीर कामिल मिसहाराला (13) धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
india vs sri lanka shreyas iyer says he tried to bribe jasprit bumrah for bowling in death overs but failed