IND VS SL 1st Test: श्रीलंकेच्या ‘या’ चार फलंदाजांपासून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका, लंकन संघ देऊ शकतो कडवी टक्कर
T-20 मालिकेत दारुण पराभव झाल्यानंतर आता कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा श्रीलंकन संघाचा (India vs Sri Lanka,1st Test) प्रयत्न असेल. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास श्रीलंकन संघ सक्षम आहे.
मोहाली: T-20 मालिकेत दारुण पराभव झाल्यानंतर आता कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा श्रीलंकन संघाचा (India vs Sri Lanka,1st Test) प्रयत्न असेल. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास श्रीलंकन संघ सक्षम आहे. श्रीलंकेचा संघ मर्यादीत षटकांच्या सामन्याऐवजी कसोटी मालिकेत जास्त मजबूत दिसतो. त्यांच्याकडे मजबूत टेक्निक असलेले फलंदाज आहेत. त्याशिवाय चांगले फिरकी गोलंदाजही आहेत. दिमुथ करुणारत्नेच्या (Dimuth Karunaratne) नेतृत्वाखाली श्रीलंकेने एक चांगला संतुलित संघ निवडला आहे. पण भारतीय संघही मजबूत आहे. मायदेशात भारताने कधीच श्रीलंकेविरोधात (IND VS SL) कसोटी सामना गमावलेला नाही. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. उद्या मोहालीमध्ये होणारा कसोटी सामना भारतासाठी अनेक दृष्टीने खास आहे. कारण कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच टेस्ट आहे तर विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना आहे.
श्रीलंकेच्या कसोटी संघात असे काही खेळाडू आहेत, जे भारतीय संघाला चकीत करु शकतात. श्रीलंकेच्या चार फलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर. अश्विन सारख्या गोलंदाजांना सामना करण्याची क्षमता आहे. श्रीलंकेचे हे चार फलंदाज भारतासाठी धोकादायक ठरु शकतात.
श्रीलंकेच्या कर्णधारापासून सावध रहाण्याची गरज
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने भारतासाठी धोकादायक ठरु शकतो. हा डावखुरा फलंदाज कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन कसोटी सामन्यात करुणारत्नेने एक शतक, एक अर्धशतकासह 278 धावा केल्या. करुणारत्नेने कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास 5500 धावा केल्या आहेत.
धनंजय ठरु शकतो धोकादायक
श्रीलंकेचा कसोटी उपकर्णधार धनंजय डिसिल्वा सुद्धा टीम इंडियासाठी धोकादायक आहे. डिसिल्वाने आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दोन सामन्यात 73 च्या सरासरीने 219 धावा केल्या आहेत. धनंजयने सुद्धा एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. आतापर्यंत त्याने आठ कसोटी शतकं आणि नऊ अर्धशतकं झळकावली आहेत.
पथुम निशांकाही धोकादायक
श्रीलंकेचा आणखी एक सलामीवीर पथुम निशांकाही टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतो. टी 20 सीरीजमध्ये निसांका चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कसोटी मालिकेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. निसांकाने टेस्ट चॅम्पियनशिपच्या चार डावात तीन अर्धशतक झळकावली आहेत. निसांच्या फलंदाजीची सरासरी 50 च्या जवळ आहे.
एंजेलो मॅथ्यूजकडे अनुभव
श्रीलंकेचा माजी कर्णधार एंजेलो मॅथ्यूजही टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतो. मॅथ्यूजने 92 कसोटी सामन्यात 44 पेक्षा जास्त सरासरीने 6338 धावा केल्या आहेत. त्याने 11 शतक झळकावली आहेत. भारताविरोधात मॅथ्यूजने 36 पेक्षा जास्त सरासरीने 957 धावा केल्या आहेत. मॅथ्यूजने भारताविरोधात तीन शतक झळकावली आहेत.
india vs sri lanka1st test 4 lankan batsmen who are big threat for team india