IND vs SL 1st Test: क्षणभर कोहलीलाही नाही समजलं, विराट बोल्ड झाला ‘त्या’ अप्रतिम चेंडूचा पहा VIDEO

IND vs SL 1st Test: कसोटी करीयरमध्ये 100 वा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीकडून (Virat kohli) आज शतकाची अपेक्षा होती. विराट आज 71 वं शतक झळकवेल म्हणून चाहत्यांच्या टीव्हीकडे नजरा लागल्या होत्या. पण ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

IND vs SL 1st Test: क्षणभर कोहलीलाही नाही समजलं, विराट बोल्ड झाला 'त्या' अप्रतिम चेंडूचा पहा VIDEO
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 4:51 PM

मोहाली: कसोटी करीयरमध्ये 100 वा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीकडून (Virat kohli) आज शतकाची अपेक्षा होती. विराट आज 71 वं शतक झळकवेल म्हणून चाहत्यांच्या टीव्हीकडे नजरा लागल्या होत्या. पण ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. विराटने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे तो शतक झळकवू शकतो असं वाटत होतं. पण असं घडलं नाही. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज एमबुलडेनियामुळे (Embuldeniya) तमाम भारतीय फॅन्सचं (Indian fans) स्वप्न भंग पावलं. विराट 45 धावांवर खेळत असताना निदान विराट आज अर्धशतक झळकवणार असं वाटत होंत. पण एमबुलडेनियाच्या एक अप्रतिम वळणाऱ्या चेंडूने घात केला. विराटही आऊट झाल्यानंतर काही क्षणांसाठी क्रीझवर थांबला. त्यालाही विश्वास बसला नाही.

बॅकफूटवर जाऊन डिफेन्सचा प्रयत्न

एमबुलडेनियाने टाकलेल्या चेंडूचा विराटने बॅकफूटला जाऊन डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने थेट ऑफ स्टंम्पचा वेध घेतला. विराटने 76 चेंडूतील त्याच्या 45 धावांच्या खेळीत पाच चौकार लगावले. कोहलीने आजच्या त्याच्या खेळीत काही चांगले ड्राइव्हज मारले. भारताने दोन विकेट झटपट गमावल्यानंतर विराट मैदानात आला होता. त्याने हनुमा विहारीसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली.

निराशा स्पष्ट दिसत होती

विहारी आणि विराटची जोडी श्रीलंकन गोलंदाजांना दाद देत नव्हती. विराट बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवरील प्रेक्षकांनी उभं राहून मानवंदना दिली. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. बाद होण्याची पद्धत त्याला सुद्धा स्वत:ला आवडली नाही.

आज विराट काय म्हणाला…

“मी बीसीसीआयचे आभार मानतो. माझ्या बालपणीच्या हिरोकडून आज मी 100 व्या कसोटीची कॅप घेतली. हे खूप सुंदर आहे” असं विराट म्हणाला. “हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझी पत्नी, माझा भाऊ, माझं कुटुंब इथे उपस्थित आहे. त्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. क्रिकेट हा एक टीम गेम आहे. तुमच्या सर्वांशिवाय हे शक्य नव्हतं. आयपीएल आणि तिन्ही फॉर्मेटमध्ये आम्ही जितक्या प्रमाणात क्रिकेट खेळतोय, ते पाहता पुढच्यापिढीने माझ्याकडून मी क्रिकेटच्या एका अस्सल फॉर्मेटमध्ये 100 सामने खेळलो ही प्रेरणा घ्यावी, असं विराटने सांगितलं.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.