Ind Vs Wi, 1st T20: ‘दात नको दाखवूस, बॉलिंग कर’, LIVE मॅचमध्ये रोहितन चहलला केलं ट्रोल, पहा VIDEO
रोहित कॅप्टन बनल्यानंतर त्याच्या स्वत:मध्ये एक वेगळी ऊर्जा दिसतेच. पण संघातील वातवरणही बदललं आहे. खेळाडू टेन्शन फ्री दिसतात. काही प्रसंगात मैदानावर विनोद, मस्करी सुरु असते.
Ind Vs Wi, 1st T20: भारताने पहिल्या टी 20 सामन्यात (First T 20 match) वेस्ट इंडिजचा (India vs west indies) सहा गडी राखून सहज पराभव केला. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 158 धावांचे लक्ष्या आरामात पार केले. भारताच्या या विजयात कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) महत्त्वाची भूमिका बजावली. हिटमॅन रोहित शर्माने मैदानावर क्षेत्ररक्षण करताना अप्रतिम झेल घेतलाच पण वेस्ट इंडिजला आपल्या बॅटचाही तडाखा दाखवला. रोहितने 19 चेंडूत 40 धावा तडकावल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार लगावले. रोहित कॅप्टन बनल्यानंतर त्याच्या स्वत:मध्ये एक वेगळी ऊर्जा दिसतेच. पण संघातील वातवरणही बदललं आहे. खेळाडू टेन्शन फ्री दिसतात. काही प्रसंगात मैदानावर विनोद, मस्करी सुरु असते. स्वत: रोहित शर्माचेच मैदानावरील किस्से व्हायरल होत आहेत.
रोहित चहलवर का चिडतो?
रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल परस्परांचे चांगले मित्र आहेत. पण मैदानावर काही वेळा रोहित युजवेंद्र चहलवर चिडल्याचं दिसलं आहे. काल पहिल्या टी 20 सामन्यादरम्यान मैदानावर मॅच सुरु असताना रोहितने युजवेंद्र चहलला ट्रोल केलं. दात दाखवू नकोस, असं रोहित युजवेंद्रला म्हणाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. आता प्रश्न हा निर्माण होतोय की, रोहित युजवेंद्रला असं का म्हणाला?
वेस्ट इंडिजच्या डावात युजवेंद्र चहल 15 व षटक टाकत होता. पहिल्या चेंडूवर चहलने आपल्या फिरकी गोलंदाजीने पोलार्डला सतावलं. पण पोलार्ड तरीही एक धाव घेऊन नॉन स्ट्राइकवर पोहोचला. त्यावर युजवेंद्र चहलला हसायला आलं. त्यावेळी स्लीपमध्ये उभा असलेल्या रोहितने दात न दाखवता चहलला लवकर गोलंदाजी करायला सांगितली. रोहितचे हे शब्द स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनने पकडले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Rohit Sharma to Chahal when Pollard was running to bowling end.
“Jaldi Jaa daant mat dikha usko (Pollard) pic.twitter.com/wtfGIAQlCC
— Cricket Holic (@theCricketHolic) February 16, 2022
दुसऱ्या वनडेच्यावेळी रोहित चहलवर चिडला होता
दुसऱ्या वनडेत ओडियन स्मिथ आणि अलझारी जोसेफची जोडी त्रासदायक ठरत होती. ही जोडी फोडण्यासाठी रोहितने ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीसाठी आणलं. त्यावेळी फिल्ड प्लेसमेंट करताना रोहित युजवेंद्र चहलवर चिडला होता. “मागे जा, काय झालं तुला? का नीट पळत नाहीयस? चल पळ तिथे ” असं रोहित बोलला होता. तो व्हिडिओ सुद्धा असाच व्हायरल झाला होता.
संबंधित बातम्या: IPL 2022 Shreyas Iyer: 53 कोटीची संपत्ती, BMW सारख्या आलिशान Cars, आयुष्यात आलेली मॉडेल, श्रेयसबद्दल सर्वकाही एका क्लिकवर IND VS WI: रोहितने घेतली इशान किशनची शाळा, हात बांधून 15.25 कोटी घेणाऱ्या खेळाडूने गुपचूप सर्व घेतलं ऐकून IND vs WI: बॉल XXXX वर जाऊन लागला, मैदानावर विराट कोहलीच्या तोंडून निघाले नको ते शब्द