India vs West Indies : अक्षर पटेलच्या मॅचविनिंग इनिंगवर रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल, नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या…
भारत आणि वेस्ट इंडिजमधील तीन एकदिवसीय सामन्यांचा शेवटचा सामना 27 जुलैला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, एका ट्विटविषयी जाणून घ्या...
नवी दिल्ली : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) दोन गडी राखून पराभव केला. ही मॅच पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळली गेली. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो होता अष्टपैलू अक्षर पटेल (Akshar Patel). पटेलनं आपल्या 40व्या एकदिवसीय सामन्यात पहिलं अर्धशतक झळकावून टीम इंडियाला (Team India) विजय मिळवून दिला. हा डावखुरा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच फलंदाजीत आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला. अक्षरनं 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली आणि धोनीच्या शैलीत षटकार खेचून सामना संपवला. त्याची ही खेळी पाहून भारताचा कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. अक्षर पटेलच्या मॅचविनिंग इनिंगचे सगळेच चाहते झाले आहेत. सोशल मीडियावर तो खूप चर्चेत असतो.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मानं अक्षरच्या स्तुतीसाठी गुजराती भाषेत एक मनोरंजक ट्विट केलं आहे. रोहितनं लिहिलं, ‘वाह. काल रात्री टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. बापू बडू सरु चे. गुजरातीमध्ये ‘बापू बधू सरू चे’ म्हणजे – बापू ठीक आहे. भारतीय खेळाडू अक्षर पटेल यांना बापूच्या नावानं हाक मारतात हे लक्षात घेण्यासारखं आहे.
एकवेळ टीम इंडियाच्या 5 विकेट 205 धावांवर पडल्या होत्या. टीम इंडियाला विजयासाठी 68 चेंडूत 107 धावा करायच्या होत्या. यानंतर दीपक हुड्डा यांनी अक्षर पटेलसोबत आघाडी घेतली. हुडानं 36 चेंडूत 33 धावा केल्या. दुसऱ्या टोकाला अक्षर पटेलनं आपला झंझावाती फॉर्म दाखवला. अक्षरने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक केले. हुड्डा बाद झाल्यानंतर त्याने शेपटीच्या फलंदाजांसह छोट्या भागीदारी खेळल्या. सामनावीर अक्षर पटेलने 35 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीनं नाबाद 64 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 182 होता. अक्षर पटेलला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
हायलाईट्स
- अक्षरनं 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली आहे
- एमएस धोनीच्या शैलीत षटकार खेचून सामना संपवला
- त्याची ही खेळी पाहून भारताचा कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे
- अक्षर पटेलच्या मॅचविनिंग इनिंगचे सगळेच चाहते झाले आहेत
- सोशल मीडियावर तो खूप चर्चेत असतो.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांचा शेवटचा सामना 27 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे.
दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली आणि सोशल मीडियावर चर्चे रंगलीय.