IND vs WI: चित्त्यासारखी झेप घेत रोहित शर्माने झेल टिपला, फिटनेसवरुन बोलणाऱ्यांना चपराक, पाहा VIDEO

India Vs West Indies T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने (Team India) वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला.

IND vs WI: चित्त्यासारखी झेप घेत रोहित शर्माने झेल टिपला, फिटनेसवरुन बोलणाऱ्यांना चपराक, पाहा VIDEO
Rohit Sharma (PC : Twitter - @EashZen)
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:20 AM

India Vs West Indies T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने (Team India) वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यामध्ये सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) झंझावाती खेळी करताना 31 चेंडूत 65 धावा केल्या. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 19 चेंडूत 35 आणि इशान किशनने 31 चेंडूत 34 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर हर्षल पटेलने जबरदस्त गोलंदाजी करत 22 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 2, दीपक चहरने 2 आणि शार्दुल ठाकूरने 2 बळी घेतले. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वोत्तम झेल टीपला. शेवटचे षटक टाकत असलेल्या शार्दुल ठाकूरच्या तिसऱ्या चेंडूवर वेस्ट इंडिजच्या डॉमिनिक ड्रेक्सने जोरदार प्रहार केला, मात्र त्याच वेळी रोहित शर्माने चेंडूच्या दिशेने झेप घेतली आणि अलगद झेल टिपला.

रोहित शर्माने डॉमिनिक ड्रेक्सचा झेल टिपल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण हा झेल जमिनीलगत आणि खूप अवघड होता, मात्र कर्णधार रोहित शर्माने डाईव्ह मारत हा झेल पूर्ण केला. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हिडीओ पाहा

सूर्याने संघाला अडचणीतून बाहेर काढलं

भारतीय संघ अडचणीत असताना सूर्यकुमार फलंदाजीला आला. इशान किशन बाद झाल्यावर तो फलंदाजीला आला. इशान बाद झाल्यानंतर रोहित शर्माही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताची धावसंख्या 13.5 षटकांत 4 विकेट्सच्या बदल्यात 93 धावा अशी होती. येथून सूर्यकुमारने अ‍ॅक्सिलेटरवर पाय ठेवत वेगाने धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. रोमारिया शेफर्डच्या चेंडूवर रोव्हमन पॉवेलने त्याचा झेल टिपला. सूर्यकुमारने शेवटच्या षटकातील पहिल्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याने आपल्या खेळीत सात षटकार आणि एक चौकार लगावला. 65 ही सूर्यकुमार यादवची त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्दीतली सर्वोच्च खेळी ठरली आहे.

व्हिडीओ पाहा

व्यंकटेश अय्यरची साथ

या सामन्यात पुन्हा एकदा व्यंकटेश अय्यरने चांगली फलंदाजी करत सूर्यकुमारला साथ दिली. दोघांनी मिळून 37 चेंडूत 91 धावा केल्या. अय्यरने 19 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांमध्ये या जोडीने तुफानी धावा केल्या आणि एकूण 86 धावा जोडल्या. अय्यर आणि सूर्यकुमार या जोडीने पहिल्या सामन्यातही भारताला विजय मिळवून दिला होता. या जोडीने सामना फिनिश केला होता. त्या सामन्यात सूर्यकुमारने नाबाद 34 आणि व्यंकटेशने नाबाद 24 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. व्यंकटेशने दुसऱ्या सामन्यातही चांगली खेळी करत 33 धावा केल्या. तो सातत्याने खालच्या फळीत संघासाठी योगदान देत आहे.

इतर बातम्या

IND vs WI : सूर्यकुमारची आतषबाजी, भारताचा विंडिजवर क्लीन स्विप विजय, ICC T20 रॅकिंग्समध्ये पहिल्या स्थानवर कब्जा

IND vs WI : वेस्ट इंडिजचा कंजूष गोलंदाज, ज्याच्यासमोर रोहित-इशान आणि विराटही हतबल

IND vs WI : पहिल्या 5 चेंडूत 2 DRS, दोन्ही सक्सेसफुल, पण फायदा टीम इंडियालाच! नेमकं घडलं काय?

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.