Ind vs Zim 3rd ODI: तिसऱ्या वनडेत राहुल त्रिपाठीचा डेब्यु का? अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

Ind vs Zim 3rd ODI: सध्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्यासामन्यात भारताने पाच विकेटने विजय मिळवला. आता दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना सोमवारी खेळला जाईल.

Ind vs Zim 3rd ODI: तिसऱ्या वनडेत राहुल त्रिपाठीचा डेब्यु का? अशी असेल टीम इंडियाची  प्लेइंग-11
Team india Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 2:20 PM

मुंबई: भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर आहे. या सीरीज मध्ये भारत तीन वनडे सामने (ODI Series) खेळणार आहे. भारताकडे (Team India) सध्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्यासामन्यात भारताने पाच विकेटने विजय मिळवला. आता दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना सोमवारी खेळला जाईल. या मॅच मध्ये भारताची नजर क्लीन स्वीपवर असेल. या मॅचचा सीरीजच्या निकालावर परिणाम होणार नाही. कॅप्टन केएल राहुल शेवटच्या तिसऱ्या वनडेत बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो.

बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. काही खेळाडूंना अजून प्लेइंग 11 मध्ये संधी मिळालेली नाही. तिसरा सामना या खेळाडूंसाठी एक संधी असू शकतो. शेवटच्या वनडेत काही खेळाडूंना संधी मिळू शकते, जे आता बेंचवर बसून आहेत.

राहुल त्रिपाठीला प्लेइंग -11 मध्ये संधी मिळेल?

आयपीएल मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला अजून डेब्युची संधी मिळालेली नाही. तिसऱ्या सामन्यात राहुलला संधी मिळू शकते. त्रिपाठीने सुद्धा कुठल्याही फॉर्मेट मध्ये भारतासाठी अजून एकही सामना खेळलेला नाही. शुभमन गिल किंवा शिखर धवनच्या जागी राहुल त्रिपाठीला संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाज आवेश खानही या दौऱ्यावर अजून खेळलेला नाही. मोहम्मद सिराज किंवा प्रसिद्ध कृष्णाच्या जागी त्याला संधी मिळू शकते. अक्षर पटेलच्या जागी शाहबाज अहमदची निवड होऊ शकते.

राहुलसाठी शेवटची संधी

कॅप्टन केएल राहुलने पहिल्या सामन्यात फलंदाजी केली नव्हती. गिल आणि धवनच्या जोडीने भारताला 10 विकेटने विजय मिळवून दिला होता. राहुलला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली होती. तो ओपनिंगला आला. पण जास्त धावा करु शकला नाही. या सीरीज नंतर केएल राहुल आशिया कप मध्ये खेळणार आहे. आशिया कप मध्ये राहुलची बॅट चालणं भारतासाठी आवश्यक आहे. झिम्बाब्वे विरुद्ध तिसरी वनडे केएल राहुलसाठी महत्त्वाची आहे. कारण या सामन्यात त्याला सूर सापडू शकतो. राहुल दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करतोय. दुखापतीमुळे तो तीन सीरीज मध्ये खेळू शकला नव्हता.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-11

भारत- केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, शुभमन गिल/राहुल त्रिपाठी, इशान किशन, दीपक हुड्डा, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज/आवेश खान

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.