Yashasvi Jaiswal | यशस्वी जैस्वालसोबत टीम इंडियात असं होऊ नये, तो त्याच्यावर अन्याय ठरेल

India West Indies Tour : कॅप्टन रोहित शर्मा मनाचा मोठेपणा दाखवेल का? कारण कॅप्टन म्हणून रोहित शर्मावर बरच काही अवलंबून आहे. यशस्वी जैस्वालसोबत काय झाल्यास अन्याय होईल?

Yashasvi Jaiswal | यशस्वी जैस्वालसोबत टीम इंडियात असं होऊ नये, तो त्याच्यावर अन्याय ठरेल
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 2:25 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियात बदलाची चर्चा सुरु आहे. टीम इंडियाला टेस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनायच असेल, तर विचार आणि टीम दोन्हींमध्ये बदल करावा लागेल. आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये टीम इंडियात अनेक बदल दिसू शकतात. रिपोर्ट्सनुसार, चेतेश्वर पुजाराचा टीममधून पत्ता कट होऊ शकतो. त्याच्याजागी यशस्वी जैस्वालला संधी मिळेल. जैस्वाल सध्या कमालीचा फॉर्ममध्ये आहे. त्याचा फॉर्म खूप लाजवाब आहे.

अशावेळी त्याला टीम इंडियात संधी मिळाली पाहिजे. पण यावेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. यशस्वी जैस्वालला टीम इंडियात संधी द्यायची असेल, तर त्याच्यासोबत अन्याय होऊ नये.

हे सुद्धा वाचा

यशस्वी बनण्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल?

तुम्ही विचार करत असाल, यशस्वी जैस्वाल सोबत काय अन्याय होणार? यशस्वी जैस्वाल सोबत असं काय होऊ शकतं? ज्यामुळे त्याची लय आणि फॉर्म बिघडू शकतो. जैस्वालला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी बनायच असेल, तर टीम इंडियाला काय काळजी घ्यावी लागेल.

यशस्वी मुंबईसाठी कुठल्या पोजिशनवर खेळतो?

यशस्वी जैस्वालला चेतेश्वर पुजाराच्या जागी संधी देण्याची चर्चा आहे. पुजारा नंबर 3 वर बॅटिंग करतो. यशस्वी जैस्वालला सुद्धा नंबर 3 वर संधी मिळणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यशस्वी जैस्वाल ओपनिंग बॅट्समन आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तो मुंबईसाठी ओपनिंग करतो. या पोजिशनवर खेळताना त्याने धावांचा पाऊस पडलाय.

यशस्वीची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कमाल

यशस्वी जैस्वालने 15 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यशस्वीने 1845 धावा केल्या आहेत. यशस्वीची सरासरी 80.21 आहे. यशस्वीने 26 इनिगमध्ये 9 सेंच्युरी झळकवल्या आहेत. यशस्वीचा कनवर्जन रेट कमालीचा आहे.

हे यशस्वी सुद्धा मान्य करेल

यशस्वी जैस्वालच्या आकड्यांवरुन तो ओपनर म्हणून यशस्वी ठरल्याच स्पष्ट होतं. ती पोजिशन सुद्धा त्याला सूट करते. टीम इंडियाने त्याला नंबर 3 वर खेळवलं, तर त्याला आपल्या खेळात काही बदल करावे लागतील. यशस्वीला विचारल्यास, आपण कुठल्याही नंबरवर खेळायला तयार आहोत, असच उत्तर तो देईल. पण ओपनिंग पोजिशनवर तो जास्त सहजतेने खेळू शकतो, हे यशस्वी सुद्धा मान्य करेल. रोहित शर्मा असा निर्णय घेईल का?

यशस्वीला ओपनिंगला कसं पाठवयाच? हा प्रश्न आहे. सध्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंगला येतात. रोहित कॅप्टन आहे, तो ओपनिंगशिवाय दुसऱ्या कुठल्या पोजिशनवरही सहजतेने खेळू शकतो. त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. यशस्वी इतका दबाव त्याच्यावर नसेल. त्यामुळे रेहित स्वत: नंबर 3 च्या पोजिशनवर येऊन यशस्वीला ओपनिंगला पाठवू शकतो. यशस्वी जैस्वालकडे तुम्ही भविष्य म्हणून पाहत असाल, तर त्याला त्याच्या नेच्युरल नंबरवर खेळायला द्या. तुम्ही पोजिशन बदलली तर तो एकप्रकारे त्याच्यावर अन्याय ठरेल.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.