India vs Ireland : वर्ल्डकपमध्ये महिला भारतीय संघाचं आयर्लंडला इतक्या धावांंचं आव्हान
महिला टी 20 वर्ल्ड कपमधील भारत आणि आयर्लंडमधील सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी केली. स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळी केली.
केपटाऊन : महिला टी 20 वर्ल्ड कपमधील भारत आणि आयर्लंडमधील सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 156 धावांचं लक्ष्य दिलं आहे. भारताकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. आयर्लंडची कर्णधार लॉरा डेलेनीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. महिला भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे आता आयर्लंड संघाला 155 धावांच्या आत रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.
भारताकडून सलामीला शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही जोडी मैदानात उतरली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र शफाली वर्मा डेलनीच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारून बाद झाली. तिने 29 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानानं डाव सावरला. त्यानंतर हरमनप्रीत कौर 13 धावा करून तंबूत परतली.
ती येत नाही तोच रोचा घोष मैदानात हजेरी लावून तंबूत हजर झाली. तिला आपलं खातही खोलता आलं नाही. त्यानंतर जेमिमानं स्मृतीसोबत चांगली खेळी केली. स्मृती मंधानाने 56 चेंडूत 87 धावा केल्या आणि बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्मा आली खरी पण भोपळाही फोडू शकली नाही. आयर्लंडकडून लॉरा डेलनीने 3, ओरला प्रेन्डरगास्टनं 2 आणि अरलेन केलीनं 1 विकेट घेतला.
आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटिल, लॉरा डेलेनी (कर्णधार), आर्लेन केली, मेरी वॉल्ड्रॉन (कीपर), लेआ पॉल, कारा मरे, जॉर्जिना डेम्पसी
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (कीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग