Team India Victory Parade Highlights in Marathi: विजयी मिरवणूक यशस्वीरित्या पार, कॅप्टन रोहितने चाहत्यांचे मानले आभार
Team India Road Show Mumbai Highlights In Marathi: आपल्या लाडक्या टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत ही विजयी मिरवणूक यशस्वीरित्या पार पडली.
टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 अंतिम फेरीत 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन 17 वर्षांनंतर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. बारबाडोसमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी थरारक विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडिया 3 जुलैला खासगी जेटने बारबाडोसहून मायदेशी परत येण्याासाठी निघाली. टीम इंडिया 4 जुलै रोजी नवी दिल्लीत पोहचली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडिया खासगी बसने मरीन ड्राईव्हच्या दिशेने आली. त्यानंतर नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपपर्यंत ओपन डेकमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर टीम इंडियाचं वानखेडे स्टेडियममध्ये पोहचल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानात प्रवेश केला आणि नाचायला सुरुवात केली. काही मिनिटं डान्स केल्यानंतर राष्ट्रगीत पार पडलं. त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आणि बीसीसीआयचे पदाधिकारी मैदानात स्थानपन्न झाले. प्रेझेंटेटर गौरव कपूर याने कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड, दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह यांच्याशी संवाद साधला. कॅप्टनसह सर्वांनी चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी 125 कोटी रुपयांंच बक्षिस जाहीर केलं होतं. टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा चेक दिला. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानात चौफेर फेरी मारुन क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. अशाप्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली.
LIVE Cricket Score & Updates
-
स्वागत समारंभानंतर टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा चेक
विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविड आणि जसप्रीत बुमराह यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी टीम इंडियाला बक्षिस म्हणून जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचा चेक दिला.
टीम इंडियाला 125 कोटींचं बक्षिस
125 CRORES FOR INDIAN TEAM. 🤯🔥 pic.twitter.com/447yKQuynS
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
-
रोहित-विराटकडून सुरुवात, मग टीम इंडियाही थिरकली
टीम इंडिया विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी नाचायला सुरुवात केली. त्यानंतर टीम इंडियाच्या साऱ्या खेळाडूंनी थिरकायला सुरुवात केली.
-
-
टीम इंडियाच्या खेळाडूंचा मुंबईकरांसह डान्स
टीम इंडियाच्या खेळाडूंनी ढोल ताशांवर ठेरा धरला आहे. वानखेडे स्टेडियमच्या प्रांगणात पोहचताच कॅप्टन रोहित शर्माने ढोल ताशांवर ठेका धरत क्रिकेट चाहत्यांसह डान्स केला.
-
कॅप्टन आणि कोच दोघांनी चाहत्यांचा वाढवला उत्साह
टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनी विजयी मिरवणुकीदरम्यान हस्तांदोलन केलं. त्यानंतर दोघांनी हात उंचावत चाहत्यांचा उत्साह वाढवला. त्यानंतर दोघांनी एकमेकांनी घट्ट मीठी मारली.
-
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ओपन डेक बसमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू आहेत. उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी पाहायला मिळतेय. तसेच विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि इतर खेळाडू आपल्या चाहत्यांचं उत्साह शूट करत आहेत.
-
-
टीम इंडिया थोड्याच वेळात मरीन ड्राईव्हमध्ये पोहचणार
टीम इंडियाचा मुंबई विमानतळावरुन निघालेला ताफा हा वांद्रे वरळी सागरी सेतुवर पोहचला आहे. टीम इंडियाचा ताफा थोड्याच वेळात मरीन ड्राईव्ह येथे पोहचणार आहे.
-
टीम इंडिया विमानतळावरुन वानखेडे स्टेडियमच्या दिशेने
टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर दाखल झाले. खेळाडूंना घेण्यासाठी 2 बस आल्या होत्या. या बसेसने टीम इंडियाचे खेळाडू हे वानखेडे स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले आहेत.
-
टीम इंडिया मुंबानगरीत, रोहितसेनेचं जोरात स्वागत
टीम इंडिया राजधानी दिल्लीतून आर्थिक राजधानी मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर पोहचले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू सहकुटुंब बाहेर पडले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आता क्रिकेट चाहते प्रतिक्षा करत आहेत.
-
Team India in Mumbai: टीम इंडियाच्या विमानाला एअरपोर्टवर वॉटर सॅल्युट
टीम इंडियाचं विमान एअरपोर्टवर दाखल होताच वॉटल सॅल्युट देण्यात आलं. पाहा व्हीडिओ
विमानतळावर खास सलामी
Team India’s flight gets a water salute at airport. pic.twitter.com/b2Xcb6ctCV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
-
Team India Victory Parade in Mumbai: टीम इंडियाच्या खेळाडूंची प्रतिक्षा
टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर पोहचले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रतिक्षा केली जात आहे. थोड्याच वेळात रोहितसेना वर्ल्ड कप ट्रॉफीसह एन्ट्री घेणार आहे. हा क्षण आपल्या मोबाईल आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी असंख्य क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे.
-
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज, रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी
विश्व विजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. टीम इंडियाची इथूनच विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आपल्या क्रिकेट चाहत्यांनी झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे.
-
वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावाचा जयघोष, पाहा Video
Rohit Sharma chants in Wankhede stadium. 🥶🔥 pic.twitter.com/AzojNUI1Na
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
-
क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज, वानखेडे स्टेडियममध्ये फ्री एंट्री
टीम इंडिया टी20 वर्ल्डकप घेऊन भारतात दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन टीम इंडिया मुंबईत येणार आहे. टीम इंडियाची मुंबईत ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक निघणार आहे. दरम्यान, वानखेडे स्टेडियममध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रीडारसिकांना स्टेडियममध्ये फ्री एंट्री मिळणार आहे. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार दुपारी 4 वाजेपासून स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. गेट नंबर 2, 3 आणि 4 मधून प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती एमसीएने दिली आहे.
-
मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची लगबग सुरु, टीम इंडियाला पाहण्यासाठी उत्साह
टीम इंडियाची विजयी मिरवणून मरीन ड्राईव्ह येथून निघणार आहे. थोड्याच वेळात या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी आता होऊ लागली आहे. ही मिरवणूक मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत असणार आहे.
#WATCH | Visuals from Marine Drive in Mumbai, as cricket fans begin gathering here.
The #T20WorldCup2024 champions Team India’s victory parade will be held from Marine Drive to Wankhede Stadium later this evening. pic.twitter.com/IXHjACF73p
— ANI (@ANI) July 4, 2024
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर विराट कोहली याने केली पोस्ट, म्हणाला…
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आदरणीय पंतप्रधान मोदींना भेटणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. आम्हाला पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद सर.
View this post on Instagram -
टीम इंडियाची भेट घेतल्यानंतर पीएम मोदींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत भेटीची माहिती दिली आहे. “चॅम्पियन्ससोबत छान भेट झाली. 7, लोककल्याण मार्ग येथे विश्वचषक विजेत्या संघाचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान संस्मरणीय गोष्टी घडल्या.”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
An excellent meeting with our Champions!
Hosted the World Cup winning team at 7, LKM and had a memorable conversation on their experiences through the tournament. pic.twitter.com/roqhyQRTnn
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2024
-
वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचली विक्ट्री परेड बस, आता फक्त खेळाडूंची प्रतिक्षा
टीम इंडिया विक्ट्री परेड बस मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पोहोचली आहे. संध्याकाळी 5 वाजता टीम इंडिया विजय परेडसाठी याच वाहनात बसणार आहे.
The Victory Parade bus for Indian team has reached Wankhede stadium 🔥 pic.twitter.com/qLoUxFF3LY
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
-
टीम इंडियाचा बारबाडोस ते दिल्ली प्रवास!
बीसीसीआयने टीम इंडियाचा बारबाडोसमधून भारतात परतण्याचा आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. बारबाडोस ते दिल्ली या विश्वविजेत्या संघाचा प्रवास कसा होता हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
Happiness All Around 🤗#TeamIndia’s arrival in India bringing joy to the many as they bask in the love and support 💙#T20WorldCup | #Champions pic.twitter.com/F282DWVKTD
— BCCI (@BCCI) July 4, 2024
-
मुंबईकर चार खेळाडूंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांना उद्या (शुक्रवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत आमंत्रित करण्यात आले आहे.
-
टीम इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा व्हिडिओ आला समोर
T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर आज दिल्लीत पोहोचल्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
#WATCH | Indian Cricket team meets Prime Minister Narendra Modi at 7, Lok Kalyan Marg.
Team India arrived at Delhi airport today morning after winning the T20 World Cup in Barbados on 29th June. pic.twitter.com/840otjWkic
— ANI (@ANI) July 4, 2024
-
मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर संध्याकाळी पाच वाजता टीम इंडियाची विजयी मिरवणूक
टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडिया पाच दिवसांनी मायदेशी परतली आहे. मात्र इतके दिवस होऊनही चाहत्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही. विमानतळापासून टीम इंडिया जिथे जिथे पोहोचली तिथे चाहत्यांचा गराडा पाहायला मिळाला. आता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. संध्याकाळी पाच वाजता मरीन ड्राईव्हवरून ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघेल.
-
पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे. विश्व विजेती टीम इंडियासकाळी 11 दरम्यान पंतप्रधान यांच्या निवासस्थानी दाखल झाली. त्यानंतर टीम इंडिया आणि पंतप्रधान मोदी यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. तसेच मोदींनी टीम इंडियांचं कौतुक केलं. टीम इंडिया आता पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. मुंबईत टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
टीम इंडियाचे खेळाडू पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल
टी20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
#WATCH | Delhi: Indian Cricket Team reaches 7, Lok Kalyan Marg, to meet Prime Minister Narendra Modi.
Team India with the T20 World Cup trophy arrived at Delhi airport today morning after winning the second T20I title. pic.twitter.com/fbmVpL2eWs
— ANI (@ANI) July 4, 2024
-
टीम इंडियाची गुजरातमधील ओपन डेकमधील बसमधून विजयी मिरवणूक
वर्ल्ड कप विजयी संघांचं 4 जुलै रोजी संध्याकाळी मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक ही नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान काढण्यात येणार आहे. डबल डेकर ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी खास गुजरातमधून ही बस मागवण्यात आली आहे. या बसवर वर्ल्ड कप विजयी संघांचे स्टीकर लावण्यात आले आहेत.
-
थोड्याच वेळात टीम इंडिया-पंतप्रधान मोदी यांची भेट
टीम इंडियाचे खेळाडू हे आयटीसी मौर्य हॉटेलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू आणि नरेंद्र मोदी यांच्यात खास बातचीच होणार आहे.
-
कोच-कॅप्टनकडन खास केक कट
टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनी वर्ल्ड कप प्रतिकृतीचा केक कट केला आहे. आयटीसी मोौर्य हॉटेलने खास वर्ल्ड कप प्रतिकृतीचा केक तयार केला होता. हा केक रोहित आणि कोच द्रविड या दोघांनी कट केला.
-
टीम इंडियाच्या खेळाडूंचा फॅमिली टाईम, थोड्याच वेळात पंतप्रधानांच्या भेटीसाठी रवाना होणार
टीम इंडियाचे खेळाडू सध्या आयटीसी मोर्या या हॉटेलमध्ये आपल्या सहकारी आणि कुटुंबियांसह वेळ घालवत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू थोड्या वेळात आपल्या आवडीचे पदार्थ खाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी निघणार आहेत.
-
टीम इंडियाची विमानात मजामस्ती, पाहा व्हीडिओ
टीम इंडिया बारबाडोस ते नवी दिल्ली असा 15 तासांचा प्रवास करत मायदेशी पोहचली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी या प्रवासादरम्यान मजामस्ती केली. या सर्व मजामस्तीचा व्हीडिओ बीसीसीआयने पोस्ट केला आहे.
टीम इंडियाची मस्ती
Travelling with the prestigious 🏆 on the way back home! 😍
🎥 WATCH: #TeamIndia were in excellent company during their memorable travel day ✈️👌 – By @RajalArora #T20WorldCup pic.twitter.com/0ivb9m9Zp1
— BCCI (@BCCI) July 4, 2024
-
बीसीसीआय अध्यक्ष-कॅप्टन रोहितच्या हस्ते केक कटिंग
टीम इंडिया काही वेळापूर्वीच आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये पोहचली. टीम इंडियाचं हॉटेलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेस बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा या तिघांनी खास केक कट केला.
-
टीम इंडिया आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये दाखल
टीम इंडियाचा ताफा अवघ्या काही मिनिटात नवी दिल्ली विमानतळावरुन हॉटेलमध्ये पोहचला आहे. टीम इंडिया आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाचं या हॉटेलमध्ये भांगड्याने स्वागत करण्यात आलं आहे.
टीम इंडियाचं हॉटेलमध्ये स्वागत
#WATCH | Men’s Indian Cricket Team at ITC Maurya Hotel in Delhi, after winning the #T20WorldCup2024 trophy.
India defeated South Africa by 7 runs on June 29, in Barbados. pic.twitter.com/bqpEmcynmp
— ANI (@ANI) July 4, 2024
-
टीम इंडिया हॉटलेच्या दिशेने रवाना
दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंतर टीम इंडिया आयटीसी मोर्या या हॉटेलच्या दिशेने रवाना झाली आहे. टीम इंडियाचं या हॉटेलमध्ये स्वागत करण्यासाठी खास केक ठेवण्यात आला आहे. तसेच विविध पदार्थही ठेवण्यात आले आहेत.
-
क्रिकेट चाहत्यांना कॅप्टन रोहितची प्रतिक्षा
टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर 15 तास प्रवास केल्यानंतर भारतात पोहचली आहे. टीम इंडियाचे खेळाडू हे नवी दिल्ली विमानतळावर पोहचले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू हे एक एक करुन बसमध्ये चढले आहेत. क्रिकेट चाहत्यांना कॅप्टन रोहितच्या एन्ट्रीची प्रतिक्षा आहे.
-
Team India Celebration LIVE: टीम इंडिया आली रे
टीम इंडिया मायदेशात आली आहे. भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह नवी दिल्ली विमानतळावर पोहचली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत सारे खेळाडू एकएक करुन वर्ल्ड कप ट्रॉफी पाहत आहेत.
इट्स होम, टीम इंडिया मायदेशी बीसीसीआयचं ट्विट
It’s home 🏆 #TeamIndia pic.twitter.com/bduGveUuDF
— BCCI (@BCCI) July 4, 2024
-
Team India Celebration LIVE: टीम इंडिया नवी दिल्ली विमानतळावर पोहचली
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. विश्व विजेता टीम इंडिया नवी दिल्ली विमानतळावर पोहचली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची टर्मिनल 3 वर प्रतिक्षा केली जात आहे.
टीम इंडियाचं मायदेशात आगमन
#WATCH | Delhi: Team India’s bus at Terminal 3 of Delhi airport as the Men’s Indian Cricket Team has landed at the airport after winning the #T20WorldCup2024 trophy. pic.twitter.com/gqHBbn1357
— ANI (@ANI) July 4, 2024
-
Team India Celebration LIVE: मुंबई पोलिसांचं आवाहन, जाणून घ्या
मुंबईत टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी क्रिकेट चाहत्यांना आवाहन केलंय. व्हीडिओ पाहून जाणून घ्या.
मुंबई पोलिसांचं क्रिकेट चाहत्यांना आवाहन
-
Team India Celebration LIVE: एनसीपीए ते मेघदूत ब्रिजपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता उत्तर वाहीनी बंद, हे आहेत पर्यायी मार्ग
मुंबईतील टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. एनसीपीए ते मेघदूत ब्रिजपर्यंत उत्तर वाहिनी बंद ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे
रामनाथ पोददार चौक (गोदरेज जंक्शन) महर्षी कर्वे रोडने – अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) – मरीन लाईन्स-चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन) पुढे इच्छित स्थळी जातील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंक्शन डावे वळण – कर्मवीर भाऊराव पाटील मार्गे सी.टी.ओ जंक्शन-सी.एस.एम.टी- पुढे इच्छित स्थळी जातील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंक्शन डावे वळण – कर्मवीर भाऊराव पाटील मार्गे सी.टी.ओ जंक्शन- मेट्रो जंक्शन- श्यामलदास जंक्शन – डावे वळण – प्रिंसेस स्ट्रिट मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील.
-
Team India Celebration LIVE: मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीमुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी पर्यायी मार्गांचा पर्याय वाहतुकीसाठी ठेवला आहे.
-
Team India Celebration LIVE: टीम इंडियाचं असं आहे दिवसभराचं शेड्युल
टीम इंडिया थोड्यात वेळात नवी दिल्ली विमानतळावर पोहचणार आहे. त्यानंतर टीम इंडिया पंतप्रधानांसह काही वेळ घालवणार आहे. भारतीय संघ पंतप्रधानांसह अल्पोआहार घेणार आहे. त्यानंतर टीम इंडिया सकाळी 11 च्या आसपास मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची संध्याकाळी मुंबईत ओपन डेक डबल डेरकर बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
-
Team India Celebration LIVE: थोड्याच वेळात टीम इंडिया नवी दिल्लीत
विश्व विजेता टीम इंडिया थोड्याच वेळात नवी दिल्लीतील विमातळावर पोहचणार आहे. साऱ्या भारतीयांना टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. नवी दिल्लीतील विमानतळावर अनेक क्रिकेट चाहत्यांनी लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
Published On - Jul 04,2024 5:38 AM