AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शमी, सिराज आणि बुमराह… क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या बॉलर्सच्या लग्जरी गाड्यांचं कलेक्शन पाहिलंय का?

Mohammad Shami Mohammad Siraj and Jasprit Bumrah Car Collection : मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज अन् जसप्रीत बुमराह हे क्रिकेटचं मैदान गाजवतात. पण यांचं कार कलेक्शनही जबरदस्त आहे... लाखो रुपये किंमत असलेल्या कार अन् रॉयल अंदाज चाहत्यांना भावतो... पाहा...

शमी, सिराज आणि बुमराह... क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या बॉलर्सच्या लग्जरी गाड्यांचं कलेक्शन पाहिलंय का?
| Updated on: Nov 17, 2023 | 1:40 PM
Share

मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : सध्या सर्वत्र वर्ल्ड कपचा फिवर पाहायला मिळतोय. परवा झालेली इंडियाने न्यूझीलंड सेमी फायनल मॅच तर क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी होती. या मॅचमध्ये विराटच्या नावावर दोन विक्रम लिहिले गेले. तर याचवेळी देशाचं मन जिंकलं ते गोलंदाज मोहम्मद शमीने… न्यूझीलंडला जिंकण्यापासून रोखण्यात शमीची मोठी कामगिरी राहिली. भारतीय क्रिकेट संघात एकाहून एक बॉलर्स आहेत. हे बॉलर्स क्रिकेटचं मैदान ताकदीने गाजवतात. या क्रिकेटपटूंचं पर्सनल लाईफही तितकंच चर्चेत असतं. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह या तिघांनाही अलिशान गाड्यांचा शौक आहे. यांच्या लक्झरी गाड्यांचं कलेक्शन क्रिकेटसह कार प्रेमींना भूरळ पाडतं.

मोहम्मद सिराजचा रॉयल अंदाज

मोहम्मद सिराज यालाही कारचं कलेक्शन करण्याचा छंद आहे. त्याचा रॉयल अंदाज अनेकांना भावतो. सिराजकडे BMW, मर्सिडीज, टोयोटा आणि महिंद्रा थार या कार आहेत. सिराजकडे BMW 5 SERIES SEDAN ही कार आहे. या कारची किंमत 68.90 लाख रुपये इतकी आहे. या कारला रॉयल लुक येण्यासाठी सिराजने तिला मॉडिफाय केलं आहे. त्याला शाही लुक दिलाय. तसंच पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा थारचा फोटोही सिराजने सोशल मीडियावर शेअर केला होता. थारची किंमत 10.98 ते 16.94 लाख रुपयांच्या घरात आहे.

कारप्रेमी मोहम्मद शमी

सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये चर्चेत असणारा मोहम्मद शमीही गाड्यांचा शौकिन आहे. शमीकडे Royal Enfield Continental GT 650 ही बाईक आहे. या बाईकची किंमत 3.39 लाख रुपये इतकी आहे. मोहम्मद शमीकडे F-Type Sports जॅग्वार कार देखील आहे. या कारची किंमत 98.13 लाख रुपये इतकी आहे. या कारची किंमत 98.13 लाख रुपयांपासून 1.53 कोटी रुपयांपर्यंत आहे.

जसप्रीत बुमराह याचं कार कलेक्शन

जसप्रीत बुमराह याच्याकडे लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे Maruti Dzire या कारसह 2.15 कोटींची Nissan GT-R ही कारही आहे. या शिवाय 13 लाखांची Toyota Etios कारही आहे. तर 93 लाख किमतीची Range Rover Velar ही कारही बुमराहकडे आहे.

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.