क्रिकेटर K L Rahul बाबा तर अॅक्टर Suniel Shetty होणार आजोबा, Athiya शेट्टीकडून गूड न्यूज
Athiya Shetty and K L Rahul : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन 2025 मध्ये बाबा होणार आहे. स्वत: क्रिकेटरने सोशल मीडियावरुन त्याच्या चाहत्यांसह ही गोड बातमी शेअर केली आहे.
टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटपटू आणि अभिनेता सुनील शेट्टी याचा जावई केएल राहुल याने त्याच्या चाहत्यांसोबत सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. आथिया शेट्टी आणि केएल राहुल हे दोघे पुढच्या वर्षी अर्थात 2025 मध्ये आई-बाबा होणार आहेत. आथियाने सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली आहे. आथियाने या पोस्टमथ्ये केएलला टॅग केलं आहे. आथियाने या पोस्टमधून त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं जाहीर केलं आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियाद्वारे आथिया आणि केएलचं अभिनंदन केलं जात आहे. अभिनेत्री आथिया शेट्टी आणि केएल राहुल हे दोघे 23 जानेवारी 2023 रोजी विवाहबद्ध झाले होते. आथिया आणि केएल या दोघांचा भव्य विवाह सोहळा हा खंडाळा येथील जहान बंगल्यात पार पडला.
केएल राहुल होणार बापमाणूस
View this post on Instagram
केएल राहुल फ्लॉप
दरम्यान केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी केएलला संधी देण्यात आली आहे. त्याआधी टीम इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 2 सराव सामने खेळवण्यात येत आहेत. केएलची दुसऱ्या सामन्यात निवड करण्यात आली आहे. मात्र केएलला या संधीचा फायदा उचलता आला नाही. केएल ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या दोन्ही डावात अपयशी ठरला. केएलने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 10 धावा केल्या.
केएलला ओपनिंगची संधी मिळणार?
दरम्यान केएल राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ओपनिंगची संधी मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचं म्हटलं जात आहे. अशात रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल याला यशस्वी जयस्वाल याच्यासोबत ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भारताकडे अखेरची संधी
भारताने मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 ने गमावली. त्यामुळे आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचायचं असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही फार महत्त्वाची आणि आव्हानात्मक असणार आहे.