‘करीयर संपवू शकतं एक पाऊल…’ IPL 2022 आधी अश्विनने गोलंदाजांना समज देतानाच दिला इशारा

क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट कमिटीने अलीकडेच क्रिकेटचे काही नियम बदलले (MCC Changed Rules) आहेत. यामुळे गोलंदाजाला थोडा फायदा होऊ शकतो.

'करीयर संपवू शकतं एक पाऊल...' IPL 2022 आधी अश्विनने गोलंदाजांना समज देतानाच दिला इशारा
रवीचंद्रन अश्विन Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 7:37 PM

नवी दिल्ली: क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट कमिटीने अलीकडेच क्रिकेटचे काही नियम बदलले (MCC Changed Rules) आहेत. यामुळे गोलंदाजाला थोडा फायदा होऊ शकतो. MCC ने बदललेल्या नियमांमध्ये असाही एक नियम आहे, ज्यावरुन खेळ भावनेचा मुद्दा उपस्थित होतो व त्यावरुन वादही होतो. नॉन-स्ट्राइक एन्डवर उभ्या असलेल्या रनरला गोलंदाज रनआऊट (Non-striker Run Out) करतो, तो हा नियम आहे. बऱ्याचकाळापासून हा नियम आहे. त्याला क्रिकेटमध्ये अनुचित श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे नॉन-स्ट्राइक एन्डवर उभ्या असलेल्या रनरला चेंडू टाकण्यापूर्वी रनआऊट करणं चुकीचं मानलं जात होतं. आता हा नियम बदलण्यात आला आहे. भारताचा दिग्गज ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्याने स्वत: अशा पद्धतीने रनआऊट केलय. अशा पद्घतीने रनआऊटला मान्यता देण्यासाठी तो सातत्याने आवाज उठवत होता.

नियम बदलावा लागला

आधी नियमांमध्ये अशा पद्धतीने रनआऊट करण्याला चुकीच्या पद्धतीने दाखवलं होतं. गोलंदाज चुकीच काहीतरी करतोय त्याला इशारा दिला पाहिजे असं वाटायचं. आता त्यांना नियम बदलावा लागला आहे. “आता एमसीसीनेच म्हटलं आहे की, चेंडू टाकण्याआधी नॉन स्ट्राइक एन्डवरुन फलंदाजाने क्रीझ सोडला, तर ती त्याची चूक असेल. गोलंदाज त्याला आऊट करु शकतो” अश्विनने आपल्या युट्यूब चॅनलवर भाष्य केलं आहे.

अश्विनच्या मागणीवर शिक्कामोर्तब

तीन वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये अश्विनने अशा पद्धतीने जोस बटलरला रनआऊट केलं होतं. त्यावेळी अनेकांनी अश्विनवर प्रश्चनचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावेळीच अश्विनने स्पष्ट केलं होतं की, त्याने काही चुकीचं केलेलं नाही आणि यापुढेही तो हे करत राहील. आता MCC ने ही आपल्या निर्णयाने अश्विन योग्य असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. फलंदाजाचं एक अतिरिक्त पाऊल गोलंदाजाचं करीयर संपवू शकतो, असं अश्विनने सांगितलं. “नॉन स्ट्राइकरच एक अतिरिक्त पाऊल गोलंदाजाचं करीयर संपवू शकतो. नॉन स्ट्राइकचा प्लेयर स्ट्राइकवर आला तर तो षटकार ठोकू शकतो” असं अश्विनचं म्हणणं आहे.

बटलर-अश्विन एकाच संघात

नियमांमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम IPL 2022 मध्येही दिसू शकतो. आता गोलंदाज अशा पद्धतीने धावबाद करण्यासाठी कचरणार नाहीत. जोस बटलर आणि अश्विन आता राजस्थान संघातून खेळतायत. 2019 मध्ये पंजाबकडून खेळताना अश्विनने बटलरला रनआऊट केलं होतं. त्यावरुन बराच वाद झाला होता.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.