IPL AUCTION 2021 | आयपीएलच्या आगामी मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया 11 फेब्रुवारीला होण्याची शक्यता

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी लिलाव प्रक्रिया फेब्रुवारीत पार पडण्याची शक्यता आहे.

IPL AUCTION 2021 | आयपीएलच्या आगामी मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया 11 फेब्रुवारीला होण्याची शक्यता
आयपीएल ट्रॉफी
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 4:13 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमाला आता काही महिने उरले आहेत. आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन भारतात होण्याची शक्यता आहे. मात्र याआधी दरवर्षी खेळाडूंचा लिलाव होता. अर्थात लिलाव प्रक्रिया पार पडते. या 14 व्या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया पुढील महिन्यात 11 फेब्रुवारीला (ipl auction 2021) होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या लिलाव प्रक्रियेबाबत आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना 20 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रंचायजीला आपल्या संघातील सोल्ड अनसोल्ड खेळाडूचं यादी आयपीएल प्रशासनाला द्यावी लागणार आहे. (indian premier league 2021 auction likely held in 11 february 2021)

मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र यामध्ये साखळी फेरीतील सामन्यांचे ठिकाण, तारीख तसेच अंतिम सामन्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच ही लिलाव प्रक्रिया कुठे पार पडणार, याबाबतचे ठिकाणही अद्याप ठरवण्यात आलेले नाही. मात्र लिलाव प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरोधातील मालिकेदरम्यान पार पडेल, अशी माहिती देण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे.

लिलाव प्रक्रिया चेन्नईत होणार?

इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेपासून होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 5-9 फेब्रुवारी तर दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे. या दोन्ही सामन्याचे आयोजन चेन्नईमध्ये खेळण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएल लिलाव प्रक्रिया चेन्नईत पार पडण्याची शक्यता आहे.

लिलावासाठी पंजाबकडे सर्वाधिक रक्कम

आगामी आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी किंग्जस इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक रक्कम आहे. म्हणजेच पंजाबचं बजेट हे 16 कोटी रुपयांचं आहे. तर चेन्नईचं बजेट हे 15 कोटी 75 लाख इतकं आहे. सनरायजर्स हैदराबादच यंदाचं बजेट हे 10 कोटी इतकं आहे. तर दिल्लीकडे 9, कोलकाताकडे 8, बंगळुरुकडे 6 कोटी 40 लाख, तर मुंबईकडे 1 कोटी 95 लाख इतकी रक्कम शेष आहे.

खेळाडूंची अदलाबदली

आगामी मोसमात संबंधित टीम मॅनेजमेंट खेळाडू्ंची अदलाबदली करण्यात इच्छुक असणार आहेत. या मोसमात अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे या युवा खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी टीम मॅनेंजमेंट आग्रही असेल.

कोरोनामुळे उशीर आणि दुबईत आयोजन

कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. दरवर्षी आयपीएलचं आयोजन हे मार्च-मे महिन्यात अपेक्षित असतं. मात्र कोरोनामुळे IPL 2020 स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यानंतर कोरोनामुळे या स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं. मात्र आता लिलाव प्रक्रिया केव्हा पार पडते, तसेच कोणते खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक झाले आहेत.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | आयपीएलच्या नव्या मोसमात नवी टीम दिसण्याची शक्यता, बीसीसीआयची जोरदार तयारी

Dale Steyn | नववर्षाच्या सुरुवातीला आफ्रिकेच्या ‘स्टेन गन’ची मोठी घोषणा, आयपीएलमध्ये खेळणार नाही

(indian premier league 2021 auction likely held in 11 february 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.