IPL Media Rights: विश्वास नाही बसणार, प्रसारण हक्क विक्रीतून BCCI ला मिळू शकतात 45 हजार कोटी

भारतात क्रिकेट लोकप्रिय आहेच, पण टीव्ही वरुन सामने पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे मीडिया राइट्स खूप महत्त्वाचे आहेत. BCCI आयपीएलचे टेलीविजन आणि डिजिटल प्रसारण हक्क चार वर्षांसाठी विकणार आहे.

IPL Media Rights: विश्वास नाही बसणार, प्रसारण हक्क विक्रीतून BCCI ला मिळू शकतात 45 हजार कोटी
IPL Twitter
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 6:05 PM

IPL 2022: IPL च्या मेगा ऑक्शनकडे (Mega Auction) सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. एकूण 590 खेळाडू ऑक्शनमध्ये आहेत. एकहजारपेक्षा जास्त खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. पण काल BCCI ऑक्शनसाठी पात्र ठरलेल्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. सध्या सर्वत्र मेगा ऑक्शनची चर्चा सुरु आहे. पण मेगा ऑक्शन इतकेच IPL चे मीडिया राइट्स सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. मेगा ऑक्शनमधून खेळाडू मालामाल होतील, तर मीडिया राइट्सच्या विक्रीतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI मालामाल होणार आहे. IPL चे हे मीडिया राइट्स मिळवण्यासाठी दोन ते तीन चॅनल्समध्ये प्रामुख्याने स्पर्धा आहे. आयपीएलच्या या 15 व्या सीजनमधून बोर्डाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, डिज्नी स्टार नेटवर्क, रिलायन्स-वायाकॉम नेटवर्क सारख्या कंपन्या आयपीएलचे मीडिया अधिकार मिळवण्याच्या शर्यतीत आहेत.

चार वर्षांसाठी दिले जातील मीडिया राइट्स 

भारतात क्रिकेट लोकप्रिय आहेच, पण टीव्ही वरुन सामने पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे मीडिया राइट्स खूप महत्त्वाचे आहेत. BCCI आयपीएलचे टेलीविजन आणि डिजिटल प्रसारण हक्क चार वर्षांसाठी विकणार आहे. ई-ऑक्शनच्या माध्यमातून हे हक्क विकले जाणार आहे. त्यासाठी 10 फेब्रुवारी आधी निविद मागवल्या जाऊ शकतात. 2023 ते 2027 असे चारवर्षांपासाठी हे प्रसारण अधिकार दिले जातील.

आधी किती किंमतली दिले होते राइट्स? 2018 ते 2022 दरम्यान बीसीसीआयने ज्या किंमतीला प्रसारण हक्क दिले होते, त्याच्या तीनपट जास्त कमाई आता बीसीसीआय करु शकते. स्टार इंडियाने 16,347 कोटींना हे मीडिया राइट्स विकत घेतले होते. स्टार इंडिया आधी सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे जवळपास दहावर्षांसाठी हे राइट्स होते. त्यांनी 8,200 कोटींना हे राइट्स विकत घेतले होते.

2008 च्या तुलनेत 2018 मध्ये स्टार इंडियाने जवळपास दुप्पट किंमतीला हे प्रसारण हक्क विकत घेतले. 2023-27 साठी प्रसारण हक्कापोटी मिळणाऱ्या रक्कमेचा आकडा तीनपट होईल, अशी बीसीसीआयला अपेक्षा आहे. प्रसारण हक्क विक्रीतून बीसीसीआयला तब्बल 40 ते 45 हजार कोटी रुपयापर्यंत कमाई होईल, असा अंदाज आहे.

Indian premier league 2022 BCCI could earn 45 thousand crore from media rights sony tv star india auction

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.