INDW vs ENGW : कसोटी सामन्यात टीम इंडियाची मजबूत पकड, मधल्या फळीच्या बॅटर्सनी डाव सावरला

भारत आणि इंग्लंड संघात कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मोठी आघाडी घेतली आहे. ७ विकेट्स गमवून ४१० धावा केल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी सामन्यावर टीम इंडियाची पकड दिसली असं म्हणायला हकरत नाही.

INDW vs ENGW : कसोटी सामन्यात टीम इंडियाची मजबूत पकड, मधल्या फळीच्या बॅटर्सनी डाव सावरला
INDW vs ENGW : कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाकडे मोठी आघाडी, चार जणींनी ठोकली अर्धशतकं
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 5:48 PM

मुंबई : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमात्र कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय महिला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घतला. दिवसअखेर भारतीय महिला संघाने ७ गडी बाद ४१० धावा केल्या. त्यामुळे पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड दिसून आली आहे. एका दिवसात ४०० च्या पार धावसंख्या करणारा भारत हा दुसरा संघ ठरला आहे. आता दुसऱ्या दिवशी भारतीय संघ या धावसंख्येत आणखी भर घालेल यात शंका नाही. दीप्ती शर्मा नाबाद ६०, तर पूजा वस्त्राकार ही नाबाद ४ धावांवर खेळत आहे. तर पदार्पणाच्या सामन्यात शुभा सतीश ६९ आणि जेमिमा रॉड्रिग्स हीने ६८ धावांची खेळी केली.

भारताकडून आघाडीला आलेल्या स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या काही खास करू शकल्या नाहीत. स्मृती १७, तर शफाली वर्मा १९ धावा करून तंबूत परतल्या. मात्र त्यानंतर शुभा सतीश आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी मोर्चा सांभाळला. तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. शुभा बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतनेही आपला दम दाखवला. ८१ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. दुर्दैवाना धावचीत झाल्याने अर्धशतक एका धावेने हुकलं. मधल्या फळीत यास्तिका भाटिया आणि दीप्ती शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम काढला. यास्तिकाने ६६ धावांची खेळी केली. तर दीप्ती नाबाद ६० धावांवर खेळत आहे.

इंग्लंडनंतर भारतीय संघ २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियासोबत कसोटी सामना खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ही कसोटी पार पडणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना भारताने सप्टेंबर २०२१ मध्ये खेळला होता. हा सामना ड्रॉ झाला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत: स्मृति मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड

इंग्लंड: टॅमी ब्यूमोंट, सोफिया डंकले, हीथर नाइट (कर्णधार), नेट सायवर-ब्रंट, डेनिएल व्याट, एमी जोन्स (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर, लॉरेन बेल

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.