IND vs SA 3rd Odi: दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप, टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय
India Women vs South Africa Women 3rd ODI Result: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
वूमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात धमाका केला आहे. टीम इंडियाने तिसरा सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. भारतीय संघाने या विजयासह दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने क्लीन स्वीप दिला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 40.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 90 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने 61 धावांची भागीदारी केली. शफालीने 39 बॉलमध्ये 25 धावा केल्या. त्यानंतर स्मृतीने प्रिया पुनियासह दुसऱ्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या. त्यानंतर पुनिया 40 बॉलमध्ये 28 रन्स करुन माघारी परतली. प्रियानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानात आली. हरमन आणि स्मृती या दोघींनी तिसर्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशीप केली. स्मृती 90 धावांवर बाद झाली. स्मृती शतकांची हॅटट्रिक लगावण्यापासून वंचित राहिली. स्मृतीने 83 बॉलमध्ये 11 चौकारांच्या मदतीने 90 धावांची खेळी केली.
त्यानंतर हरमनप्रीतने जेमिमाह रॉड्रिग्ससह चौथ्या विकेटसाठी 43 रन्स जोडल्या. हरमनप्रीतने 48 बॉलमध्ये 42 रन्स केल्या. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स आणि रिचा घोष या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. टीम इंडियाने 40.4 ओव्हरमध्ये 220 धावा केल्या. जेमिमाहने 31 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. तर रिचाने 3 बॉल नॉट आऊट 6 रन्स केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा 3-0 ने मालिका विजय
3️⃣ Matches 3️⃣4️⃣3️⃣ Runs and yes, no one can forget about THAT wicket ☺️
Vice-captain Smriti Mandhana wins the Player of the Series award as #TeamIndia win the ODI series 3⃣-0⃣ 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/Y7KFKaW91Y #INDvSA | @mandhana_smriti | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/u0oazQ1mtM
— BCCI Women (@BCCIWomen) June 23, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि श्रेयंका पाटील.
वूमन्स दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड्ट (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, नदिन डी क्लर्क, नॉन्डुमिसो शांगासे, मिके डी रिडर (विकेटकीपर), नॉनकुलुलेको मलाबा, अयाबोंगा खाका आणि तुमी सेखुखुने.