VIDEO – 6,2,4,1,6,6, लास्ट ओव्हरमध्ये बेकार धुतलं, शेवटच्या चेंडूवर Mumbai Indians चा रोमहर्षक विजय

MI अमीरातने अबु धाबी नाइट रायडर्सवर रोमहर्षक विजय मिळवला. ड्वेन ब्राव्हो आणि नजीबुल्लाह जादरान MI अमीरातच्या विजयाचे हिरो ठरले. अशक्य वाटणारं लक्ष्य ब्राव्हो-जादरानने सोपं बनवलं.

VIDEO - 6,2,4,1,6,6, लास्ट ओव्हरमध्ये बेकार धुतलं, शेवटच्या चेंडूवर Mumbai Indians चा रोमहर्षक विजय
Bravo-ZadranImage Credit source: ILT20
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 10:03 AM

दुबई – सध्या परदेशात T20 लीग सुरु आहेत. या लीगमध्ये IPL मधील फ्रेंचायजींनी टीम विकत घेतल्या आहेत. दुबईमध्ये इंटरनॅशनल लीग T20 सामन्यात MI अमीरातने अबु धाबी नाइट रायडर्सवर रोमहर्षक विजय मिळवला. ड्वेन ब्राव्हो आणि नजीबुल्लाह जादरान MI अमीरातच्या विजयाचे हिरो ठरले. अशक्य वाटणारं लक्ष्य ब्राव्हो-जादरानने सोपं बनवलं. अबु धाबी नाइट रायडर्सने पहिली बॅटिंग केली. MI अमीरातला विजयासाठी 171 धावांच लक्ष्य दिलं होतं. कायरन पोलार्डच्या टीमने शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य पार केलं. 5 विकेट राखून MI अमीरातने विजय मिळवला.

पहिल्या बॉलपासून हल्लाबोल

हे सुद्धा वाचा

MI अमीरातला विजयासाठी लास्ट ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती. हे लक्ष्य अनेकांना अशक्य वाटत होतं. पण ब्राव्हो आणि जादरानने प्लानिंग केली होती. आंद्रे रसेल लास्ट ओव्हर टाकणार होता. ब्राव्हो-जादरानने पहिल्या चेंडूपासून रसेलच्या बॉलिंगवर हल्ला चढवला.

रसेलने लुटवल्या धावा

मैदानात दोघांनी फोर-सिक्सचा पाऊस पाडला. लास्ट ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि एक फोर मारला. रसेलने लास्ट ओव्हरमध्ये 25 धावा दिल्या. त्यामुळे अबु धाबीची टीम जिंकता, जिंकता हरली. अबुधाबीकडून धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक 65 धावा केल्या. त्याने 40 चेंडूत 8 फोर आणि 2 सिक्स मारले. सिल्वाशिवाय कॅप्टन सुनील नरेनने 18 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. पण त्यांच्या मेहनतीवर रसेलने लास्ट ओव्हरमध्ये पाणी फिरवलं. अबुधाबीच्या बॉलर्सनी सामन्यावर पकड बनवली होती. जादरानच वादळ

एमआय अमीरातकडून आंद्रे फ्लेचरने सर्वाधिक 53 धावा केल्या. 19 ओव्हरपर्यंत MI ने 5 विकेट गमावून 151 धावा केल्या होत्या. अबु धाबी जिंकणार असं दिसत होतं. पण लास्ट ओव्हरमध्ये ब्राव्हो आणि जादरानने मॅच फिरवली. जादरानने 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूंवर 2 सिक्स मारले. ब्राव्होने एक फोर, एक सिक्स मारला. जादरानने 17 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. ब्राव्होने 6 चेंडूत 15 धावा केल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.