IPL 2021 | CSK आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सज्ज, ट्रेनिंग कॅंपसाठी धोनीसह युवा खेळाडू चेन्नईत

चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super King) आयपीएलच्या 13 व्या (ipl) मोसमातील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. त्यामुळे धोनीसेनेचा (ms dhoni) या मोसमात जोरदार कमबॅक करण्याचा मानस असणार आहे.

IPL 2021 | CSK आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सज्ज, ट्रेनिंग कॅंपसाठी धोनीसह युवा खेळाडू चेन्नईत
चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super King) आयपीएलच्या 13 व्या (ipl) मोसमातील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. त्यामुळे धोनीसेनेचा (ms dhoni) या मोसमात जोरदार कमबॅक करण्याचा मानस असणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 2:25 PM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) आता अवघा एक महिना बाकी आहे. खेळाडू, फ्रंचायजी आणि क्रिकेट चाहते या पर्वासाठी (Ipl 2021) उत्सुक आहेत. या मोसमाच्या पार्श्वभूमीवर सर्वच खेळाडू हे आपल्या फिटनेसवर काम करत आहेत. आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी जोरदार सराव करत आहेत. चेन्नई सुपर किंगज्सचे काही खेळाडू हे सराव शिबिरासाठी 3 मार्चला चेन्नईत दाखल झाले आहेत. यामध्ये कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आणि अनुभवी अंबाती रायुडूचा समावेश आहे. चेन्नईने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ipl 2021 chennai super kings ms dhoni ambati rayudu and ruturaj gaikwad reach at chennai for training camp)

धोनीचे जोरदार स्वागत

धोनी चेन्नईच्या विमानतळावर पोहचला. त्यानंतर तो गाडीने एका हॉटेलमध्ये पोहचला. त्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. याचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे तसेच नुकताच मराठमोळा ऋतुराज गायकवाडही चेन्नईत दाखल झाला आहे.

सरावासाठी चेन्नईत

आयपीएलच्या दृष्टीने महेंद्रसिंह धोनी चेन्नईत या ट्रेनिंग कॅंपमध्ये जोरदार सराव करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फक्त आयपीएलमध्ये खेळतोय. त्यामुळे धोनी या ट्रेनिंग कॅपमध्ये कसून तयारी करणार आहे. या ट्रेनिंग कॅम्पला 11 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

चेन्नईसाठी आनंदाची बातमी

चेन्नईने लिलावाआधी राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील रॉबिन उथप्पाला ट्रान्सफर विंडोद्वारे आपल्या ताफ्यात घेतलं. तर एन जगदीशन आणि मराठमोळा ऋतुराज गायकवाडही चेन्नईकडून खेळतात. हे तिनही खेळाडू सध्या सुरु असलेल्या विजय हजारे करंडकात आपल्या टीमसाठी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. फलंदाजाची दमदार कामगिरी चेन्नईसाठी चांगेल संकेत आहेत. या तिघांकडून आयपीएलमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

चेन्नईची गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी

चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा मोसम निराशाजनक ठरला. सुरेश रैना आणि हरभजन सिंह या महत्वाच्या 2 खेळाडूंनी ऐनवेळेस माघार घेतली. तर कर्णधार महेंद्र सिंह धोनी अपयशी ठरला. धोनीला त्या मोसमात धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. चेन्नने पहिल्या 12 मोसमात दरवेळेस प्लेऑफमध्ये (टॉप 4) प्रवेश मिळवला होता. मात्र गेल्या मोसमात चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. मात्र यावेळेस उथप्पा, जगदीशन आणि ऋतुराज जोरदार फॉर्ममध्ये आहेत. तसेच सुरेश रैनाही या मोसमात खेळणार आहेत. यामुळे चेन्नई या मोसमात जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) , इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्‍लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्‍पा, के गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरी निशांत.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | आयपीएलच्या14 व्या मोसमाआधी धोनीच्या चेन्नईला मोठा झटका, दिसणार नाही ‘हे’ नाव

(ipl 2021 chennai super kings ms dhoni ambati rayudu and ruturaj gaikwad reach at chennai for training camp)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.