IPL 2021 : ज्या खेळाडूला कोळसा समजून विराटने संघातून काढलंं, आता तोच हिरा होऊन घेणार बदला

आरसीबी संघातून काढून टाकलेल्या ख्रिस मॉरीस (chris morris) आता वचपा काढण्याच्या तयारीत आहे. (ipl 2021 chris morris )

IPL 2021 : ज्या खेळाडूला कोळसा समजून विराटने संघातून काढलंं, आता तोच हिरा होऊन घेणार बदला
ख्रिस मॉरिस
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 11:57 AM

मुंबई : आयपीएलचा 14 वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जवळजवळ सर्वच टीम्सने आपापली तयारी पूर्ण केली आहे. यंदाचा विजयी मुकूट आपल्याच शिरावर असावा यासाठी प्रत्येक संघाने चंग बांधला आहे. आपली टीम आणखी मजबूत व्हावी यासाठी जवळजवळ प्रत्येक फ्रेंचायझीने आपापल्या अनेक खेळाडूंना या हंगामाच्या सुरुवातीलाच रिलीज केले होते. रिलीज खेळाडूंच्या जागेवर त्यांच्यापेक्षा दमदार खेळाडूला घेऊन संघ आणखी मजबूत करण्याचा यामागे प्रत्येक फ्रेंचायझीचा हेतू होता. क्रिकेटपटू विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RCB) टीमनेसुद्धा आपल्या अनेक खेळाडूंना संघातून डिच्चू दिला होता. मात्र, यातील एक खेळाडू विराट कोहलीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आरसीबी संघातून काढून टाकलेला ख्रिस मॉरीस (chris morris) आता वचपा काढण्याच्या तयारीत आहे. (IPL 2021 Chris Morris released by RCB taken by Rajasthan Royals will try to play best)

राजस्थाननं तगडी किंमत देऊन खरेदी केलं, ठरला सर्वांत महागडा खेळाडू

ख्रिस मॉरीस यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून खेळतोय. विशेष म्हणजे कोहलीच्या संघातून त्याला डिच्चू देण्यात आलेला असला तरी तो यंदाच्या हंगामातील सर्वांत महागडा खेळाडून ठऱलेला आहे. तब्बल 16.25 कोटी रुपये एवढी तगडी किंमत देऊन राजस्थानने त्याला खरेदी केले आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला गेला. या हंगामात मॉरीसने एकूण 9 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 11 जणांना बाद केलं होतं. तरीसुद्धा बंगळुरु संघाने यंदाच्या हंगामात त्याला संघातून काढून टाकलं.

वचपा काढण्याची संधी

त्यानंतर मॉरिसला तब्बल 16 कोटी रुपयांना मॉरिसला राजस्थानने घेतल्यामुळे मी एक अष्टपैलू खेळाडू असल्याचे दाखवण्याची नामी संधी आता मॉरीसकडे चालून आली आहे. या हंगामात मॉरिसने जर चांगला खेळ करुन दाखवला तर हा खेळ विराट कोहलीसाठी एक चपराक असणार आहे, असे सांगितले जात आहे. यासाठी ख्रिस मॉरिसने तयारीसुद्धा केली आहे.

मॉरिसचा आयपीएलनामा

मुळात पाहायचं झालं तर ख्रिस मॉरिस हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. सर्व स्तरावर चांगला खेळ खेळण्याची क्षमता असल्यामुळेच त्याला राजस्थानने या हंगामातील सर्वात जास्त किंमत देऊन खरेदी केले आहे. आतापर्यंतच्या आयपीएलच्या हंगामात त्याने एकूण 70 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने 7.81 या ईकॉनॉमी रेटने आतापर्यंत 80 बळी घेतलेले आहेत. आयपीएलच्या हंगामात मॉरिसने एकूण 3 सामन्यांमध्ये प्रत्येकी 4 बळी घेतले आहेत. तसेच एकूण 70 सामन्यांत मॉरिसने 157.87 च्या स्ट्रईक रेटने 551 धावा केलेल्या आहेत. आतापर्यंत मॉरिसने दोन वेळा अर्धशतकी खेळी खेळलेली आहे. मॉरिसने आयपीएलमध्ये सर्वाधिक 82 धावा केलेल्या आहेत. मॉरिसने आतापर्यंत 39 चौकार आणि 30 षटकार मारलेले असून आतापर्यंत एकूण 34 झेल घेतलेले आहेत.

इतर बातम्या :

IPL 2021: विराट कोहलीच्या RCB ला झटका, सलामीवीराला कोरोनाची लागण

Photos | हार्दिक आणि नताशासोबत मुलगा अगस्त्यची स्विमिंग पूलमध्ये धमाल

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला झटका, धोनीचा अपमान करणारा खतरनाक खेळाडू खेळणार नाही!

(IPL 2021 Chris Morris released by RCB taken by Rajasthan Royals will try to play best)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.