IPL 2021 : सर जाडेजाच्या बहारदार बॅटिंगला साक्षीचा सलाम, पोस्ट शेअर करत म्हणाली…

साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) देखील इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत जाडेजाच्या बॅटिंगला सलाम ठोकला आहे. (IPL 2021 CSK vs RCB MS Dhoni Wife Sakshi Dhoni Salute Ravindra Jadeja Batting Performance)

IPL 2021 : सर जाडेजाच्या बहारदार बॅटिंगला साक्षीचा सलाम, पोस्ट शेअर करत म्हणाली...
रवीद्र जाडेजा आणि साक्षी धोनी
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 7:51 AM

मुंबई : क्रिकेट रसिकांसाठी रविवारचा दिवस खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं तर बॅट आणि बॉलच्या मधुर आवाजाने प्रेक्षकांचे कान मंत्रमुग्ध केले. पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलच्या (Harshal Patel) एकाच ओव्हरमध्ये जाडेजाने 37 धावांची लूट केली. या खेळीचं अनेकांनी बदारदार वर्णन केलं, जाडेजाला शाबासकी दिली. चेन्नईचा संघनायक महेंद्र सिंग धोनीची पत्नीही याला कशी अपवाद असू शकेल. साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) देखील इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत जाडेजाच्या बॅटिंगला सलाम ठोकला आहे. (IPL 2021 CSK vs RCB MS Dhoni Wife Sakshi Dhoni Salute Ravindra Jadeja Batting Performance)

साक्षीचा जर जाडेजाच्या बॅटिंगला सलाम

रविंद्र जाडेजाची 20 व्या ओव्हरमधील फटकेबाजी बघून साक्षी धोनीचे अक्षरश: डोळे दिपले. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सर जाडेजासाठी स्पेशल स्टोरी ठेवली. सर रवींद्र जाडेजा बिस्ट मोड, असं तिने त्या स्टोरीत लिहिलं. त्याचबरोबर जाडेजाला घोडे सवारी आवडते. त्यामुळे तिने घोड्याची इमोजी वापरत जाडेजाच्या बॅटिंगची स्तुती केली आहे तसंच त्याच्या बॅटिंगला सलाम ठोकला आहे.

Sakshi Dhoni Insta Story

Sakshi Dhoni Insta Story

जाडेजाची झंझावात खेळी, हर्षल पटेलला धू धू धुतलं!

सामन्यातील 20 वी ओव्हर बंगळुरुचा पर्पल कॅप होल्डर हर्षस पटेल टाकायला आला. हर्षलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे हर्षलचा विश्वास दुणावलेला होता. मात्र जाडेजाने हर्षलचं सिक्सने स्वागत केलं. जाडेजाने सलग 4 सिक्स लगावले. जाडेजाने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. मात्र हा नो बोल देण्यात आला.

त्यामुळे चेन्नईला 1 अतिरिक्त धाव मिळाली. जाडेजाने या पुढच्या चेंडूवर सलग चौथा सिक्स लगावला. यासह जाडेजाने तुफानी अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर जाडेजाने 2 धावा घेतल्या. त्यानंतर पुन्हा त्याने 5 वा सिक्स खेचला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जाडेजाने चौकार लगावला. यासह जाडेजाने 28 चेंडूत 5 सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावा ठोकल्या.

जाडेजाच्या बॅटिंग परफॉर्मन्सवर कोहली खूश

“जाडेजाकडे क्षमता आहे. आज त्याने ती दाखवून दिली. मी त्याच्या बॅटिंग आणि बोलिंग परफॉर्मन्सने खूप खूश आहे. दोन महिन्यांनंतर तो भारतीय संघाकडून खेळेल. जेव्हा तुमचा मुख्य अष्टपैलू फलंदाज उत्तम कामगिरी करत आहे हे पाहून तुम्हाला निश्चित आनंद होईल. साहजिक मलाही आनंद झालाय.”

जेव्हा तो चांगला खेळतो आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो, तेव्हा त्याला रोखणं कठीण असतं साहजिक संधीही जास्त मिळतात. जाडेजाच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने मी खूप खूश आहे”, असं मॅच संपल्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला.

(IPL 2021 CSK vs RCB MS Dhoni Wife Sakshi Dhoni Salute Ravindra Jadeja Batting Performance)

हे ही वाचा :

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’

Ravindra Jadeja | ‘सर’ रवींद्र जाडेजाची वादळी खेळी, 20 व्या ओव्हरमध्ये चोपल्या 37 धावा, बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान

IPL 2021 | ‘कॅप्टन कूल’ विराटसेनेचा विजयी रथ रोखणार, पाहा महेंद्रसिंह धोनी आणि 25 एप्रिलचं विजयी कनेक्शन

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.