IPL 2021 : कोलकात्याच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे, कोडवर्ड्समधून सूचना, पाहा नेमका प्रकार काय?
कोलकात्याच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे आणि सूचना देण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर केला गेला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. (IPL 2021 KKR vs PBKS Kolkata Dugout codwords Player Goes Video Viral on Social Media)
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 21 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Kolkata knight Riders vs Punjab Kings) या उभय संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकात्याने पंजाबला 5 विकेट्सने नमवून पराभवाची मालिका खंडित केली आणि शाहरुखच्या (Shahrukh Khan) चेहऱ्यावर हास्याची लकेर फुलवली. या सामन्यात विशेष लक्षवेधी घटना पाहायला मिळाली. कोलकात्याच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे आणि सूचना देण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर केला गेला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा खुलेआम कोडवर्ड्सचा वापर आणि ते ही डगआऊटमधून… हे पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. (IPL 2021 KKR vs PBKS Kolkata Dugout codwords Player Goes Video Viral on Social Media)
नेमका प्रकार काय?
पंजाब किंग्ज संघाने 9.4 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून 47 धावा केल्या. डावाची दहावी ओव्हर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा टाकत होता आणि क्रीजवर पंजाबचा फलंदाज मोइसेस हेनरिकेज बॅटिंग करत होता. कोलकाताच्या डगआऊटमधूनकोडवर्ड्सच्या माध्यमातून इशारे गेले गेले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
— Cricket Unlimi (@CricketUnlimi) April 26, 2021
Virender Sehwag criticizes KKR’s ‘code word’ strategy https://t.co/QY34p3J5EN
— Bourbiza Mohamed (@techgateorg) April 26, 2021
@IPL @irfan @akash chopra tht code word from KKR ‘5’ means don’t give more than 5 runs in an over and previously code word ’54’ means total score shouldn’t be cross more than 54 in that particular over…I guess…
— Sanjay Patel (@spsanju47) April 26, 2021
कोडवर्ड्स नेमके कशासाठी वापरले गेले?
कोलकात्याच्या डगआऊटमधून हे कोडवर्ड्स नेमके कशासाठी वापरले गेले? का वापरले गेले? हे आणखी समोर येऊ शकलेले नाही. परंतु प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र कोलकाता संघ प्रशासनाला हा नेमका काय प्रकार आहे, याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
कोलकात्याची पराभवाची मालिका खंडित
कोलकात्याने आपल्या पराभवाची मालिका खंडित केली. कोलकात्याची बोलर्सने शानदार गोलंदाजी केली तसंच कर्णधार ओयन मॉर्गनने शेवटपर्यंत पीचवर पाय रोवला. त्यामुळे पंजाबवर कोलकात्याने 5 विकेट्सने मात केली. 16.4 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात कोलकात्याने पंजाबने दिलेलं 123 धावांचं माफक लक्ष्य गाठलं.
(IPL 2021 KKR vs PBKS Kolkata Dugout codwords Player Goes Video Viral on Social Media)
हे ही वाचा :
IPL 2021 : आर. अश्विनच्या आयपीएल सोडण्याच्या निर्णयावर कोच रिकी पाँटिंगचं ट्विट, म्हणाला…