ना मोठं नाव, ना मोठा सेलिब्रिटी, ऑस्ट्रेलियाच्या दिलदार क्रिकेटपटूकडून भारताला लाखोंचा ऑक्सिजन बहाल

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपलं योगदान म्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने (Pat Cummins) 37 लाख रुपयांची मदत केली आहे.

ना मोठं नाव, ना मोठा सेलिब्रिटी, ऑस्ट्रेलियाच्या दिलदार क्रिकेटपटूकडून भारताला लाखोंचा ऑक्सिजन बहाल
Pat Cummins
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 7:33 PM

मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. 24 तासात 3 लाख 52 हजार 991 कोरोना रुग्ण आढळून आले तर 2812 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढणाऱ्या भारतासमोर सध्या ऑक्सिजनचं संकट उभं राहिलं आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, परंतु पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत भारताच्या या लढ्यात आपलं योगदान म्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने (Pat Cummins) 50 हजार अमेरिकन डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) मदत केली आहे. कमिन्सने पीएम केअर फंडाला ही मदत दिली आहे. पॅट कमिन्स सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळत आहे. (IPL 2021: Pat Cummins Donates $50,000 To PM Cares Fund to Purchase Oxygen For Indian Hospitals)

कमिन्सने त्याच्या या मदतीबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर खेळाडूंनादेखील अशीच मदत करण्याचे आवाहन केलं आहे. कमिन्सने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ”एक खेळाडू म्हणून माझ्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि मी पीएम केअर फंडासाठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो,

कमिन्सने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, मी गेली अनेक वर्ष भारतात येतोयआणि मी या देशाच्या प्रेमात पडलो आहे. येथील लोक माझ्यावर भरभरुन प्रेम करतात. कोरोना संकटाच्या काळात अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएल खेळवणे योग्य की अयोग्य यावर सध्या चर्चा सुरू आहेत. मी भारत सरकारला सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळात आयपीएलमुळे किमान चार तास तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे.

चेन्नईविरुद्धच्या सामन्याा हिरो

आयपीएल 2020 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने पॅट कमिन्स या जलदगती गोलंदाजाला 15.50 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात सामावून घेतलं होतं. गेल्या आठवड्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या कोलकाता विरुद्ध चेन्नई या सामन्यात कमिन्सने 34 चेंडूंत 4 चौकार 6 षटकारांसह नाबाद 66 धावांची वादळी खेळी करत सर्वांची मनं जिंकली होती.

कमिन्सची आयपीएल कारकीर्द

आयपीएलमध्ये कमिन्स आतापर्यंत 35 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 33.03 च्या सरासरीने 33 विकेट्स मिळवल्या आहेत. 34 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजीतही त्याने अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेत त्याने आतापर्यंत 2 अर्धशतकांसह आणि 143 च्या स्ट्राईक रेटने 306 धावा जमवल्या आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2021: आयपीएलला मध्येच गुडबाय, रॉयल चॅलेंजर्सचे दोन खेळाडू मायदेशी परतले, कारण…

IPL 2021 : आर अश्विनचा आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय, ट्विट करुन घोषणा, दिल्लीला धक्का!

IPL 2021 : सर जाडेजाच्या बहारदार बॅटिंगला साक्षीचा सलाम, पोस्ट शेअर करत म्हणाली…

(IPL 2021: Pat Cummins Donates $50,000 To PM Cares Fund to Purchase Oxygen For Indian Hospitals)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.