अर्जुन तेंडुलकरच्या IPL निवडीवर बहीण साराची पहिली प्रतिक्रिया

यंदाच्या आयपीएल लिलावात माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याचादेखील समावेश करण्यात आला होता.

अर्जुन तेंडुलकरच्या IPL निवडीवर बहीण साराची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 3:38 PM

चेन्नई : यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक खेळाडूंनी कोट्यवधींची उड्डाणं घेतली. किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर (Glenn Maxwell) तगडी बोली लागली. विराट कोहलीच्या बंगळुरुने तब्बल 14.25 कोटींची बोली लावून, ग्लेन मॅक्स्वेलला आपल्या ताफ्यात घेतलं. तर दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने (Chris Morris) आयपीएलच्या हंगामात (IPL Auction) इतिहास रचला आहे. ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली (Chris Morris IPL bid price) लागली. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. या लिलावात माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याचादेखील समावेश करण्यात आला होता. या लिलावात मुंबई इडियन्सने अर्जुनवर बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. (Sara Tendulkar reacts after her brother Arjun bags a bid from Mumbai Indians in IPL auction 2021)

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी केलं आहे. अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून (वरीष्ठ संघाकडून) त्याचा टी-20 डेब्यू केला आहे. अर्जुनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. याआधी तो 2018 मध्ये भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी अर्जुन प्रयत्न करत राहिला. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे. दरम्यान, मुंबईच्या संघासाठी डेब्यू करणाऱ्या अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.

अर्जुन तेंडुलकरची आयपीएल लिलावासाठी निवड झाल्यापासून अर्जुनला आणि त्याचा पिता सचिन तेंडुलकरला काहीजण ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अर्जुनच्या आयपीएल निवडीबाबत सचिनने किंवा त्याची पत्नी अंजलीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) अर्जुनचं कौतुक केलं आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन अर्जुनचं कौतुक केलं आहे. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ताफ्यात सामावून घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन अर्जुनच्या स्वागताची एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. तीच पोस्ट साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. सोबत साराने म्हटलं आहे की, ‘ही संधी तुझ्याकडून कोणीच हिरावू शकणार नाही’.

इतर बातम्या

वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूसह अनेक अनुभवी खेळाडू, पाहा मुंबई इंडियन्सची टीम

श्रीलंका क्रिकेटला सगळ्यात मोठा धक्का, 18 शतक झळकावणाऱ्या ओपनरसोबत 15 खेळाडू देश सोडणार!

IPL Rajasthan Royals Team 2021 | ख्रिस मॉरिसकडून रेकॉर्ड ब्रेक, विराटचा ‘हा’ खेळाडूही ताफ्यात, पाहा राजस्थानची टीम

(Sara Tendulkar reacts after her brother Arjun bags a bid from Mumbai Indians in IPL auction 2021)

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.