IPL 2022: धोनीने कॅप्टनशिप सोडल्यानंतर End of an era ट्रेडिंगमध्ये, ‘थाला आमच्यासाठी तू…’
IPL 2022: भारताचा यशस्वी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनीने (MS Dhoni) अखेर आयपीएलमधील (IPL) चेन्नई सुपर किंग्स संघाचं (CSK) कर्णधारपद सोडलं आहे.
मुंबई: भारताचा यशस्वी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनीने (MS Dhoni) अखेर आयपीएलमधील (IPL) चेन्नई सुपर किंग्स संघाचं (CSK) कर्णधारपद सोडलं आहे. धोनीचा कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय योग्य वाटत असला, तरी धोनीचे चाहते मात्र भावूक झाले आहेत. धोनीने कॅप्टनशिप सोडल्यानंतर टि्वटरवर लगेच End of an era ट्रेंड होत आहे. यामध्ये अनेक टि्वटर युझर्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एमएस धोनी भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोन वर्ल्ड कप जिंकले. पण आयपीएलमध्येही धोनी मागे नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK च्या टीमने तब्बल चार वेळा जेतेपदास गवसणी घातली. धोनीचा आजचा कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय सीएसकेच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. सोशल मीडियावर धोनीचे चाहते भावूक झाले आहेत.
परिस्थिती कुठलीही असली, तरी धोनी….
11 वेळा चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि नऊ वेळा फायनलमध्ये पोहोचला. हे साधसूध यश नाहीय. हे शक्य झालं, ते फक्त धोनीमुळे. धोनीने सीएसकेकडून खेळताना अनेक क्रिकेटपटूंना घडवलं. धोनीचा हाच करिष्मा सर्वांना त्याच्याकडे आकर्षित करतो. फक्त भारतातच नाही, अन्य देशातील क्रिकेटपटूंनी धोनीचं नेतृत्व मान्य केलं आहे. क्रिकेटच्या मैदानात धोनी एक चणाक्ष, हुशान कर्णधार समजला जातो. परिस्थिती कुठलीही असली, तरी धोनीने कधीही हार मानली नाही. प्रतिकुल परिस्थितीतही शांत रहाण्याची त्याचा गुण विशेष सर्वांना भावतो.
धोनीने चेन्नई संघाची धुरा आता रवींद्र जाडेजाकडे सोपवली आहे. धोनी या सीजनमध्ये मैदानावर खेळताना दिसेल. पण तो कॅप्टनच्या भूमिकेत नसेल.
End of an era. I remember the time after IPL 2021 Final, where MS Dhoni praised KKR and said KKR deserved to win the title. That won so many hearts. ?pic.twitter.com/S7BNhaj76Z
— Sohom (@AwaaraHoon) March 24, 2022
End of an Era, Will miss you skip #MSDhoni. pic.twitter.com/0f4I0fTwRn
— D (@82__mohali) March 24, 2022
When i started watching cricket he was india’s captain End of an era ?? Greatest indian captain #MSDhoni ?#Mahirat ❤ pic.twitter.com/QGVmHJramf
— Mounesh PSPK♡ (@Mounesh_White) March 24, 2022
थाला आमच्यासाठी तू नेहमीच कॅप्टन
थाला आमच्यासाठी तू नेहमीच कॅप्टन कुल आहेस. आमचा लीडर आहेस, प्रेरणास्त्रोत आहे असं एका युझरने म्हटलं आहे. जाडेजासाठी मी जितका आनंदी आहे, तितकच धोनी कॅप्टन नसल्यामुळे मला वाईट वाटतय. तू जे काही केलस, त्यासाठी माही भाई थँक्यू असं एका युझरने म्हटलं आहे.
END OF AN ERA
How it started How it’s ends pic.twitter.com/kqFINxTQIl
— Adarsh (@iam_trulyAdarsh) March 24, 2022
Best IPL skipper steps down from captaincy. End of an era ? pic.twitter.com/73PtgskiQu
— v. (@v1mal7) March 24, 2022
महेंद्र सिंह धोनीने स्वत: चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने रवींद्र जाडेजाला टीमचा नवीन कॅप्टन म्हणून निवडलं आहे. जाडेजा 2012 पासून संघाचा महत्त्वाचा भाग आहे. तो आमच्या संघाचा तिसरा कॅप्टन आहे.