IPL 2022 Auction: बंगळुरुतल्या 2 दिवसांच्या महालिलावात 590 खेळाडूंची विक्री, धवन, वॉर्नर, श्रेयस, बोल्टवर सर्वांच्या नजरा
IPL 2022 साठीच्या महालिलावापूर्वीच प्रत्येक संघाने एकापेक्षा एक तगडे खेळाडू संघांमध्ये रिटेन केले आहेत. जसे की मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, चेन्नईने महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जाडेजासारख्या खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. प्रत्येक संघाने तीन किंवा चार खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे.
मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) चा महालिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व 10 फ्रँचायझींचे डोळे आता बंगळुरुकडे लागले आहेत, जिथे 590 खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. आयपीएलच्या (Indian Premier League) इतिहासातला हा सर्वात मोठा लिलाव ठरू शकतो. काही खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागेल. तर काही खेळाडू स्वस्तात विकले जातील. टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जब्बरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडताना पाहायला मिळणार आहे.
IPL 2022 साठीच्या महालिलावापूर्वीच प्रत्येक संघाने एकापेक्षा एक तगडे खेळाडू संघांमध्ये रिटेन केले आहेत. जसे की मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, चेन्नईने महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जाडेजासारख्या खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. प्रत्येक संघाने तीन किंवा चार खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. तर राजस्थान, पंजाब आणि हैदराबादने प्रत्येकी दोन खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. सध्या पंजाब किंग्सच्या पर्समध्ये सर्वात जास्त पैसे आहेत. पंजाबच्या संघमालकांकडे 72 कोटी रुपये आहेत. पंजाब किंग्जनंतर सनरायझर्स हैदराबादकडे सर्वात जास्त पैसे आहेत. हैदराबादच्या पर्समध्ये 68 कोटी रुपये, राजस्थान रॉयल्सकडे 62 कोटी, लखनऊ संघाकडे 59 कोटी आणि अहमदाबादकडे 52 कोटी रुपये आहेत. याशिवाय चेन्नई, कोलकाता आणि मुंबईकडे 48 कोटी रुपये आहेत. दिल्लीकडे सर्वात कमी 47.50 कोटी रुपये शिल्लक आहेत.
12 फेब्रुवारीला सर्वात मोठ्या लिलावाचा पहिला दिवस
IPL 2022 च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी 161 खेळाडूंवर बोली लावली जाईल. लिलावाचे प्रक्षेपण ब्रॉडकास्ट चॅनलवर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. तर दुपारी 12 वाजल्यापासून खेळाडूंच्या बोलीला सुरुवात होणार आहे.
टॉप प्लेयरपासून लिलाव सुरू होईल
लिलावात, बड्या खेळाडूंवर सर्वात आधी बोली लावली जाईल, हे सर्व खेळाडू 2 कोटींच्या बेस प्राईसमध्ये आहेत. या यादीत 3 भारतीय खेळाडू देखील आहेत ज्यात रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची नावं आहेत.
??? ????? ?? ??? ???? ??????? ??
A bidding war on the cards ?? ??
Here are the 1⃣0⃣ Marquee Players at the 2⃣0⃣2⃣2⃣ #IPLAuction ? pic.twitter.com/lOF1hBCp8o
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022
सर्व संघांच्या नजरा इशान किशनवर
या लिलावात सर्व 10 फ्रँचायझींच्या नजरा इशान किशनवर असतील. यष्टीरक्षक आणि सलामीवीर इशान किशनला आपल्या संघात घेण्यासाठी सर्व संघ प्रयत्न करतील. काही बातम्यांनुसार, अहमदाबाद आणि लखनऊच्या संघ मालकांनी त्याच्याशी आधीच संपर्क साधला होता. पण या डावखुऱ्या फलंदाजाने लिलावात येण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या
IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?
तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत