AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Verma Mumbai Indians: वडील इलेक्ट्रिशियन, हलाखीची परिस्थिती, मुंबई इंडियन्सने बदललं तिलक वर्माचं आयुष्य

Tilak Verma Mumbai Indians: तिलकचे वडील पेशाने इलेक्ट्रीशियन आहेत. रोजच्या दिवसाचा खर्च भागवताना त्यांना तिलकच्या क्रिकेट कोचिंगचा खर्च झेपणारा नव्हता. त्यावेळी तिलकच्या खर्चाची सर्व जबाबदारी त्याच्या कोचने उचलली.

Tilak Verma Mumbai Indians: वडील इलेक्ट्रिशियन, हलाखीची परिस्थिती, मुंबई इंडियन्सने बदललं तिलक वर्माचं आयुष्य
(Pic Credit Tilak Verma Insta)
| Updated on: Feb 14, 2022 | 12:01 PM
Share

मुंबई: IPL मुळे खेळाडूंना ओळख मिळाली. आयपीएल स्पर्धेने अनेकांचं जीवन बदलून टाकलं. हालपेष्टा, कष्ट, हलाखीचं जीवन जगणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना IPL स्पर्धेमुळे ऐश्वर्य लाभलं. आयपीएलने एकारात्रीत आयुष्य बदलून टाकलेल्या खेळाडूंची यादी मोठी आहे. दरवर्षी या यादीत काही नवीन नावं जोडली जातात. यंदाच्या मेगा ऑक्शनने (Mega Auction) हैदराबादच्या एका मुलाचं आयुष्य बदलून टाकलं. त्याचं नाव आहे तिलक वर्मा. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये काल तिलक वर्माच्या (Tilak Verma) नावाचा पुकार झाला. त्यावेळी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी वेगवेगळ्या फ्रेंचायजींमध्ये एकच स्पर्धा सुरु झाली. अखेर मुंबई इंडियन्सने बाजी मारली. तिलकला आयपीएल मेगा ऑक्शनच्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचवण्यात त्याच्या कोचचं मोठं योगदान आहे. तिलकचे वडील पेशाने इलेक्ट्रीशियन आहेत. रोजच्या दिवसाचा खर्च भागवताना त्यांना तिलकच्या क्रिकेट कोचिंगचा खर्च झेपणारा नव्हता. त्यावेळी तिलकच्या खर्चाची सर्व जबाबदारी त्याच्या कोचने उचलली. तिलक हैदराबादच्या चंद्रयानगुट्टा भागात रहायचा. तिथल्या गल्ल्यांमध्ये तो क्रिकेट खेळायचा. तिलकचा स्टान्स, कट आणि पुलचे फटके खूपच सुंदर आहेत.  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने 1.7 कोटीची बोली लावत त्याला विकत घेतलं. तिलक आता कोट्यधीश बनला असून त्याच्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सने बोली लावली होती.

कोचला दिलं सर्व श्रेय

मुंबई इंडियन्सकडून निवड झाल्यानंतर तिलकने याचे सर्व श्रेय कोच सलाम बायश यांना दिलं आहे. कोचिंगशिवाय बायश यांनी तिलकला क्रिकेट खेळण्यासाठी लागणारं सर्व आवश्यक साहित्य दिलं. त्याच्या दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली. घरात रहायला जागा दिली. मुलाला क्रिकेट शिकण्यासाठी अकादमीत पाठवता येईल, अशी नम्बूरी नागराजू यांची आर्थिक स्थिती नव्हती. त्यावेळी सलाम बायश पुढे आले. त्यांनी तिलकचा सगळा खर्च उचलला.

इतके पैसे मिळतील, असं वाटलं नव्हतं

तिलक सध्या कटकमध्ये हैदराबादच्या रणजी संघासोबत आहे. “कधी इतके पैसे मला मिळतील, याची मी कल्पना केली नव्हती. आयपीएल खेळणार हा विश्वास होता. पण इतके पैसे मिळतील अशी अपेक्षा नव्हती. मला जो संघ इतका आवडायचा. आता त्यांच्याकडून खेळायला मिळणार हे स्वप्न साकार होण्यासारख आहे. मला या निमित्ताने महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. स्वत:च्या खेळामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन” असे तिलकने सांगितले. तिलकने तीन वर्षांपूर्वी रणजी स्पर्धेत पदार्पण केलं. 2020 मध्ये तो भारताच्या अंडर 19 संघाचा भाग होता. भारताचा संघ फायनलमध्ये हरला होता. दोन मॅचमध्ये त्याने 38 आणि 48 धावा केल्या होत्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.