Tushar Deshpande IPL 2022 Auction: धोनीच्या टीममधून खेळणारा मराठी मुलगा तुषार देशपांडे कोण आहे?

Tushar Deshpande IPL 2022 Auction: 2016-17 मध्ये प्रथम श्रेणीमध्ये मुंबईकडून त्याने पदार्पण केलं. विजय हजारे करंडकासह दुलीप ट्रॉफीमध्येही तृषार खेळला आहे.

Tushar Deshpande IPL 2022 Auction: धोनीच्या टीममधून खेळणारा मराठी मुलगा तुषार देशपांडे कोण आहे?
Tushar deshpande Photo source You tube
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 6:37 PM

TATA IPL 2022 Mega Auction च्या पहिल्या दिवशी काल एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. यात 74 खेळाडूंना आयपीएल फ्रेंचायजींनी विकत घेतलं. या खेळाडूंमध्ये मुंबईकर तुषार देशपांडे (Tushar Deshpande) सुद्धा आहे. मूळचा मुंबईचा असलेल्या तुषार देशपांडेला महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतलं. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या तुषारची बेस प्राइस 20 लाख रुपये होती. त्याला त्याच किंमतीला CSK ने विकत घेतलं. 2016-17 मध्ये प्रथम श्रेणीमध्ये मुंबईकडून त्याने पदार्पण केलं. विजय हजारे करंडकासह दुलीप ट्रॉफीमध्येही तुषार खेळला आहे.

मूळचा मुंबईकर

मूळचा मुंबईचा असलेल्या तुषारला सर्वप्रथम 2020 आयपीएलमध्ये संधी मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने त्याला विकत घेतलं होतं. दिल्ली कॅपिटल्सने त्याला पाच सामन्यात संधी दिली. त्यात त्याने तीन विकेट घेतल्या. दिल्लीने त्याला 2021 च्या आयपीएल सीजनसाठी मात्र रिटेन केलं नाही. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या रिटेन न केल्यामुळे वाईट वाटलं होतं, असं त्याने सांगितलं. क्रिक ट्रॅकरने हे वृत्त दिलं आहे.

तेव्हा मला वाईट वाटलं होतं?

“फ्रेंचायजीने मला सोडून द्यावं, इतका मी वाईट खेळ केला नव्हता. एखाद्या सामन्यात तुम्ही खराब कामगिरी केली, याचा अर्थ तुम्ही वाईट गोलंदाज आहात, असा होत नाही” बिहाईड द स्टंम्पस विथ अनुजमध्ये कार्यक्रमात तुषारने मनातील ही खंत बोलून दाखवली होती. तुषारने आयपीएल 2022 मध्ये पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण काल त्याच्यावर चेन्नईने बोली लावली. त्यामुळे त्याला आता धोनी सारख्या महान खेळाडूसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी मिळणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तुषार देशपांडेने 20 सामन्यात 50 विकेट घेतल्या आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.