IPL 2022 : गौतम गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ, राहुलचंही जिंकलं मन, कोण आहे छोटा एबी डिविलियर्स?

क्रिकेट विश्वात कोणताही दिखावा चालत नाहीय, असं अनेकदा बोललं जातं. क्रिकेटमध्ये तुमची ओळख ही तुमच्या कामगिरीवरुन ठरते. अशीच कामगिरी आयुष बडोनी याने केलीय. आयपीएलच्या या हंगामात सगळीकडे आयुषच्याच नावाची चर्चा आहे. याच आयुष बडोनीनं आयपीएलच्या चौथ्या सामन्यात गौतम गंभीर आणि राहुलचा विश्वासही सार्थ केलाय. वाचा आयुषच्या बहारदार कामगिरीविषयी...

IPL 2022 : गौतम गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ, राहुलचंही जिंकलं मन, कोण आहे छोटा एबी डिविलियर्स?
आयुष बडोनीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 2:50 PM

मुंबई : सध्या सगळीकडे एकाच नावाची चर्चा आहे. ते नाव आहे आयुष बडोनी. आयपीएलच्या (IPL 2022) चौथ्या सामन्यापर्यंत आयुष बडोनीचं (Ayush Badoni) नाव कुणाला माहितही नव्हतं. आता मात्र, क्रिकेट (Cricket) विश्वात आयुषच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. आयुषने 41 बॉलमध्ये 54 रन काढले आणि आपल्या लखनऊ सुपरजायंट्सचा सामना इतका चांगल्या पद्धतीनं खेळला की चाहत्यांमध्ये आयुषच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली. आयुषने दीपक हुड्डासोबत 68 बॉलमध्ये 87 रन काढून सामना खेळला. यावेळी आयुष आणि दीपकच्या जोरावर लखनऊ सुपरजायंट्सचा संघ 158 रनपर्यंत पोहचला. क्रिकेट विश्वात कोणताही दिखावा चालत नाहीय, असं अनेकदा बोललं जातं. क्रिकेटमध्ये तुमची ओळख ही तुमच्या कामगिरीवरुन ठरते. पहिल्याच सामन्यात आयुषने आपल्या कौशल्याची चुनूक दाखवून दिली. 41 बॉलमध्ये 54 रन काढून त्याने क्रिकेट प्रेमींच्या ह्रदयात स्थान मिळवलंय.

गौतम गंभीरची अचूक निवड

क्रिकेट विश्वातील अनुभवी खेळाडुंच्या कामाचा, त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचा अनेकदा क्रिकेट प्रेमींना प्रत्येय येत असतो. असाच प्रत्येय गौतम गंभीर यांच्या अचूक निवडीचा आणि राहुलने दाखवले्या विश्वासाचा आला आहे. यंदाच्या आयपीएलआधी आयुषने फक्त एकदा आयपीएलचा सामना खेळला होता. तुम्हालाही ऐकुण आश्चर्य वाटलं ना. त्यावेळी खेळलेल्या सामन्यात आयुषला फक्त आठ रन काढता आले होते. मात्र, तरीही गौतम गंभीरने आणि केएल राहुलने आयुषवर विश्वास ठेवला. गौतमच्या याच विश्वासाचा प्रत्येत आयुषने अर्धशतक पूर्ण केल्यावर क्रिकेट प्रेमींना आला.  तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल तर माहीत करुन घ्या की, राहुल आयुषला एबी डिविलियर्स मानतो. जेव्हा सामना हातातून गेला तेव्हा राहुल म्हणाला होता की, ‘आयुष आमचा बेबी एबी आहे. तो तर पहिल्या सामन्यापासूनच उत्तम खेळतोय. आयुष लहान असूनही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये आयुषला मिळालेली संधी सुवर्ण असून त्याला ती फायदेशीर ठरलीय. दबावात येऊन आयुषने केलेली कामगिरी कमालीची आहे.’ अंस म्हणत राहुलने आयुषचं तोंडभरून कौतुक केलंय.

तरबेज गोलंदाजीवर आयुषचा फुलशॉट

आयुष वयाने लहान असला तरी त्याच्या कामाने त्याने अनेक क्रिकेट विश्वातील दिग्गजांची मनं जिंकली आहेत. आयुषने लोकी फर्ग्युसन सारख्या तरबेज गोलंदाजाच्या बॉलवर फुलशॉट मारला आहे. इतकंच नव्हे तर आयुषने राशिद खानच्या विरोधातही सहज फलंदाजी केली. विशेष म्हणजे आयुषने राशिदच्या गोलंदाजीवरही लांब षटकार मारलाय. कौशल्य आणि आपल्या मेहनतीवर आयुष बडोनी तुम्हाला भविष्यात मोठा क्रिकेटर झाल्याचं दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. कमी वयात खेळण्याची असलेली जिद्द आणि भल्याभल्या तरबेज गोलंदाजांसमोर आयुष करत असलेली बहारदार कामगिरी कौतुकास पात्र आहे.

इतर बातम्या

Cotton : कापसाचे उत्पादन ‘रामभरोसे’च, अंदाज वर्तवणाऱ्या यंत्रणेचा नेमका फायदा काय?

Beed | वंचित आघाडीचे नेते शिवराज बांगर यांच्या समर्थनार्थ आंदोलन, बीडमध्ये सर्वपक्षीय संघटना रस्त्यावर

तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, भाजप विरोधात एकत्र या, mamata banerjee यांचा एल्गार, पवारांसह गैरभाजप मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्रं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.