Mumbai Indians च्या सामन्यांबद्दल महत्त्वाचा निर्णय, IPL 2022 मधील महत्त्वाची UPDATE, फ्रेंचायजींनी घेतलेला आक्षेप

IPL 2022: IPL चा 15 वा सीजन महाराष्ट्रात आयोजित होणार आहे. मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. मुंबईत 55 तर पुण्यात 15 सामने खेळवले जाणार आहेत.

Mumbai Indians च्या सामन्यांबद्दल महत्त्वाचा निर्णय, IPL 2022 मधील महत्त्वाची UPDATE, फ्रेंचायजींनी घेतलेला आक्षेप
आयपीएल लिलाव
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 3:16 PM

IPL 2022: IPL चा 15 वा सीजन महाराष्ट्रात आयोजित होणार आहे. मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. मुंबईत 55 तर पुण्यात 15 सामने खेळवले जाणार आहेत. IPL चा यंदाचा हंगाम मुंबईत आयोजित होत असल्याने मुंबई इंडियन्सला (Mumbai indians) घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार असे अनेकांना वाटत होते. आयपीएलमधल्या काही फ्रेंचायजींनी मुंबईच्या संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळणार त्यावर आक्षेप घेतला होता. यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता नव्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सच्या संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा काही प्रमाणात लाभ मिळणार आहे. मुंबई इंडियन्सचे चार सामने वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एकूण तीन स्टेडियममध्ये 55 सामने होणार आहेत. आयपीएलमधल्या सर्वच संघांचे प्रत्येकी चार सामने वानखेडेवर होणा्र आहेत. तोच लाभ मुंबई इंडियन्सच्या संघाला सुद्धा मिळणार आहे.

फ्रेंचायजींच्या विरोधाबद्दल माहित नाही

“मुंबई इंडियन्सची टीम मुंबई ऐवजी अन्य स्टेडियम्सवर जास्त खेळेल. मुंबई इंडियन्सचा संघ मुंबईत खेळणार, याला अन्य फ्रेंचायजींनी विरोध केल्याबद्दल मला माहित नाही. या फक्त बातम्या आहेत. आम्हाला कुठली तक्रार प्राप्त झाली किंवा कुणी आक्षेप घेतला, तर आम्ही त्यावर विचार करु” असे सिनियर बीसीसीआय पदाधिकाऱ्याने इनसाइड स्पोटर्सला सांगितलं.

अन्य फ्रेंचायजींचा काय आक्षेप होता?

मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर खेळायला मिळणार म्हणून बाकी फ्रँचायझी चिंतेत होते. वानखेडे हे मुंबईचे घरचे मैदान असल्याने त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. अनेक फ्रँचायझींना विश्वास आहे की, मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानाचा फायदा मिळेल आणि उर्वरित संघांना न्याय मिळणार नाही. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचे सामने काही फ्रँचायझींना सोयीचे वाटत नाहीत.

“इतर कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. मुंबई इंडियन्सने आपले बहुतांश सामने वानखेडेवर खेळले तर ते चुकीचे ठरेल. हे मैदान वर्षानुवर्षे त्यांचा बालेकिल्ला आहे. फ्रँचायझींनी ही चिंता व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्सने त्यांचे बहुतांश सामने डी.वाय.पाटील आणि पुण्यात खेळले तर त्याची कोणत्याही फ्रँचायझीला अडचण नसेल” असे वृत्तात म्हटलं होतं.

IPL 2022 BCCI official confirms NO Home Advantage for Mumbai Indians Rohit Sharma & Co to play matches in Pune

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.