IPL 2022 : आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना BCCI धडा शिकवणार, जेसन रॉय-हेल्सवर बंदी?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI ) कोणत्याही वैध कारणाशिवाय खेळाडूंनी आयपीएलमधून बाहेर पडू नये किंवा ते स्पर्धेतून वगळले जाऊ नये यासाठी नवीन धोरण तयार करण्यावर काम करत आहे.

IPL 2022 : आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना BCCI धडा शिकवणार, जेसन रॉय-हेल्सवर बंदी?
सौरव गांगुलीनं बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलं? नव्या इनिंगची घोषणा, भाजपात प्रवेश करणार?Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 11:05 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI ) कोणत्याही वैध कारणाशिवाय खेळाडूंनी आयपीएलमधून बाहेर पडू नये किंवा ते स्पर्धेतून वगळले जाऊ नये यासाठी नवीन धोरण तयार करण्यावर काम करत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) मधून काही खेळाडूंनी ऐन वेळी माघार घेतल्यानंतर काही फ्रँचायझींनी बोर्डाकडे चिंता व्यक्त केल्या होत्या. यानंतर भारतीय बोर्डाने या दिशेने पावले टाकण्याची योजना आखली आहे. अलीकडेच आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या (IPL Governing Council) बैठकीत यावर चर्चा झाली. यादरम्यान अशी चर्चा होती की जेव्हा लिलावात खेळाडूंना कमी रक्कम मिळते, तेव्हा त्यांच्यात स्पर्धेतून बाहेर पडण्याचा कल असतो.

इंग्लंडच्या जेसन रॉय आणि अॅलेक्स हेल्स यांनीही याच कारणामुळे आयपीएल 2022 सोडण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. या दोन्ही खेळाडूंना लिलावात त्यांच्या बेस प्राईसमध्येच (आधारभूत किमतीतच) खरेदी करण्यात आले. नंतर, जेसन रॉय आणि अॅलेक्स हेल्स यांनी बायो बबल फटीगचं कारण देत त्यांची नावं मागे घेतली, या दोघांनाही लिलावापूर्वीच आयपीएलचं वेळापत्रक आणि बायो बबलची संपूर्ण माहिती होती. पण त्यांनी लिलावानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

माघार घेणाऱ्या खेळाडूंचा वॉच लिस्टमध्ये समावेश केला जाईल

क्रिकबझच्या अहवालात गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, फ्रँचायझी या स्पर्धेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते कोणत्या ना कोणत्या योजनेअंतर्गत खेळाडूंवर पैसे लावतात. जर एखादा खेळाडू कुठलंही कारण देऊन बाहेर पडला तर संघांच्या योजना धुळीला मिळतात. कोणती कारणे किरकोळ मानली जातील हे सांगण्यात आले नसले तरी छोट्या-छोट्या मुद्द्यावरून स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंना वॉच लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते.

बंदीची शक्यता

क्रिकबझने या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “एक धोरण असेल ज्याच्या अंतर्गत आयपीएलमधून माघार घेणाऱ्याला काही वर्षांसाठी स्पर्धेत खेळण्यास प्रतिबंध केला जाईल.” हा निर्णय केस दर केस असेल आणि कारवाई करण्यापूर्वी कारण योग्य आहे की नाही यावर संशोधन केले जाईल.

दुखापत किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची कारणे साधारणपणे न्याय्य मानली जातात. बऱ्याच दिवसांपासून अनेक खेळाडू आयपीएलमधून माघार घेत आहेत. आरसीबी आणि केकेआरमध्ये निवड झाल्यानंतर मिचेल स्टार्कनेही असेच केले. बीसीसीआयने या प्रकरणी नमूद केले आहे की त्यांना त्यांच्या बोर्डाने पद सोडण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत खेळाडूकडे फारच कमी पर्याय असतात.

इतर बातम्या

kl Rahul captaincy: ‘या’ पनोतीपेक्षा ऋषभ, श्रेयस अय्यर दहापट चांगले’, लखनौच्या पराभवानंतर केएल राहुल वाईट पद्धतीने ट्रोल

SRH vs RR: हैदराबादकडे एकापेक्षा एक चांगले खेळाडू, रॉयल्सच्या दमदार खेळाडूंना रोखू शकेल सनरायझर्स?

IPL 2022 RR vs SRH Head to Head: राजस्थान विरुद्ध हैदराबाद, आज होणार काँटे की टक्कर, फक्त एका विजयाने पुढे आहे हा संघ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.