IPL 2022: Mumbai Indians ची टीम अजूनही Play off मध्ये क्वालिफाय करु शकते का? जाणून घ्या संपूर्ण गणित

IPL 2022: कॅप्टनसह सर्व दिग्गज फ्लॉप आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ या परिस्थितीतून बाहेर येऊन, प्लेऑफ पर्यंत पोहोचू शकतो? समजून घ्या पूर्ण गणित.

IPL 2022: Mumbai Indians ची टीम अजूनही Play off मध्ये क्वालिफाय करु शकते का? जाणून घ्या संपूर्ण गणित
IPL 2022: मुंबई इंडियन्स Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 2:56 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सर्वात यशस्वी संघांबद्दल बोलायच झाल्यास, मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नाव सर्वात पहिलं येईल. याचं कारण आहे, या टीमने सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. पण सध्या मुंबई इंडियन्सचा सर्वात खराब फॉर्म सुरु आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी या सीजनमध्ये केली आहे. टीमला सलग आठ पराभवांचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात तळाला 10 व्या स्थानावर आहे. सलगच्या या पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफ (Play off) मध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर बनला आहे. आयपीएल मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाला कमीत कमी प्लेऑफ पर्यंत पोहोचायचे असते. पण सध्या मुंबई इंडियन्ससाठी हे कठीण दिसतय. संघाने खूपच खराब प्रदर्शन केलं आहे.

कॅप्टनसह सर्व दिग्गज फ्लॉप

फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात मुंबई इंडियन्सने सुमार कामगिरी केली आहे. कॅप्टनसह सर्व दिग्गज फ्लॉप आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ या परिस्थितीतून बाहेर येऊन, प्लेऑफ पर्यंत पोहोचू शकतो? समजून घ्या पूर्ण गणित.

मुंबईचे किती पॉइंट होऊ शकतात?

गुणतालिकेत मुंबईची सध्याची आठ सामने, 0 विजय, 8 पराभव, 0 गुण अशी स्थिती आहे. मुंबईचे अजून सहा सामने बाकी आहेत. आयपीएलच्या या सीजनमध्ये दोन नवीन टीम्सनी डेब्यू केलाय. त्यामुळे बीसीसीआयने स्पर्धेच्या फॉर्मेटमध्ये बदल केला आहे. प्रत्येत संघाला 14 सामने खेळायचे आहे. मागच्या सीजनमध्येही इतकेच सामने खेळायचे होते. मुंबईने आता जरी सर्व सामने जिंकले, तर त्यांची गुणसंख्या 12 होईल. प्रत्येक विजयानंतर टीमला दोन पॉइंट मिळतात.

प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी किती पॉइंट आवश्यक?

आता मुंबईने सर्व सामने जिंकूनही 14 पॉइंटस होणार नाहीत. प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी इतके पॉइंट आवश्यक आहेत. पण 12 गुण असातनाही काही संघ प्लेऑफमध्ये खेळले आहेत. सनरायजर्स हैदराबाद या टीमने 2019 साली 12 पॉइंटसह प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं होतं.

मुंबईला 12 पॉइंटसह क्वालिफाय करायचं असेल, तर बऱ्याच प्रमाणात गोष्टी अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहेत. यात किंतु-परंतुचा भाग मोठा आहे.

मुंबईने सर्व सामने जिंकले, तरी….

सध्याची गुणतालिकेत पोझिशन बघितली तर गुजरात टायटन्सचा संघ 12 पॉइंटसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे संघ आहेत. या संघांचा सध्याचा फॉर्म बघता या टीम्स पुढचे तीन सामने सहज जिंकतील. त्यामुळे त्यांची गुणसंख्या 16 होईल. गुजरातने आपले दोन सामने जिंकल्यानंतर त्यांची गुणसंख्या 16 होईल. अशा परिस्थितीत मुंबईचं बाहेर जाणं निश्चित आहे. मुंबईने सर्व सामने जिंकले, तरी अन्य टीम्सचे शेवटी 12 पेक्षा जास्त पॉइंटस असतील.

कुठल्या संघांचे सहा पॉइंटस?

दिल्ली कॅपिटल्स, कोलकात नाइट रायडर्स, पंजाब किंग्सचे सहा-सहा पॉइंटस आहेत. दिल्ली आणि पंजाबचे सात सामने झाले आहेत. कोलकाताच्या सहा मॅचेस झाल्या आहेत. मुंबईच्य़ा टीमला एखादा चमत्कारच फायनलमध्ये पोहोचवू शकतो. काही संघ सलग सामने हरल्यानंतर मुंबईला मोठ्या फरकाने उर्वरित सामने जिंकावे लागतील. हे सर्व जर-तर वर अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेरच गेली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.