IPL 2022: Ravindra jadeja आणि CSK मध्ये काही तरी बिनसलय, हैराण करणारी बातमी समोर आली, सत्य काय आहे?

IPL 2022: चेन्नईच्या प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या अपेक्षा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या दरम्यान आता चेन्नई सुपर किंग्स संघात सर्व काही आलबेल नसल्याचं समोर येतय.

IPL 2022: Ravindra jadeja आणि CSK मध्ये काही तरी बिनसलय, हैराण करणारी बातमी समोर आली, सत्य काय आहे?
अनफॉलो केल्याचा वादImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 11:49 AM

मुंबई: आयपीएलचे चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) टीमला यंदाच्या सीजनमध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. संघाच्या खराब प्रदर्शनामुळे सीजनच्या मध्यावरच रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) कॅप्टनशिप सोडली. पुन्हा महेंद्रसिंह धोनीला (MS dhoni) कॅप्टन बनवण्यात आलं. चेन्नईच्या प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या अपेक्षा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या दरम्यान आता चेन्नई सुपर किंग्स संघात सर्व काही आलबेल नसल्याचं समोर येतय. रवींद्र जाडेजा आणि सीएसकेमध्ये काहीतरी बिनसलय. सीएसकेने अलीकडेच एक कृती केली. त्यावरुन जाडेजा आणि सीएसकेमध्ये काही तरी बिनसल्याची चर्चा सुरु झालीय. रवींद्र जाडेजला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग-11 मध्ये जागा मिळाली नव्हती. सोशल मीडियावरील चर्चेनुसार, चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जाडेजाला सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

कोणी कोणाला अनफॉलो केलं?

सीएसकेने जाडेजाला अनफॉलो केल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. सीएसकेच्या फॉलोइंग लिस्टमध्ये आता रवींद्र जाडेजाचं नाव नाहीय. हे असं घडलं असेल, तर त्याचं उत्तर चेन्नई फ्रेंचायजीच देऊ शकते. पण यावरुन चेन्नई आणि रवींद्र जाडेजामध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचं स्पष्ट होतय. जाडेजाचा कॅप्टन बनवलं, तेव्हा तो संघाची प्रतिष्ठा कायम टिकवेल अशी अपेक्षा केली जात होती. पण असं घडलं नाही. सीजनच्या मध्यावरच त्याने धोनीकडे पुन्हा नेतृत्व सोपवलं.

वॉर्नरॉ-SRH सारखंच प्रकरण

मागच्या सीजनमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि डेविड वॉर्नरमध्ये जे घडलं, तसंच आता चेन्नई आणि रवींद्र जाडेजामध्ये सुरु आहे. मागच्या सीजनमधल्या खराब प्रदर्शनामुळे डेविड वॉर्नरला कॅप्टनशिपवरुन हटवलं होतं. त्याला प्लेइंग- 11 मध्येही स्थान मिळालं नव्हतं. फ्रेंचायजीने वॉर्नरला रिटेनही केलं नाही. 2016 मध्ये वॉर्नरच्याच नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादने आयपीएलचे विजेतेपद मिळवलं होतं. वॉर्नर या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतोय.

जाडेजाची या सीजनमध्ये कामगिरी कशी आहे?

रवींद्र जाडेजाने आपल्या आयपीएल करीयरची सुरुवात राजस्थान रॉयल्समधून केली होती. 2012 च्या लिलावात जाडेजाला सीएसकेने विकत घेतलं. दोन वर्ष चेन्नईची टीम निलंबित असताना तो गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. आयपीएल 2022 मध्ये जाडेजाचं प्रदर्शन चमकदार राहिलेलं नाही. या सीजनमध्ये जाडेजाने 10 सामन्यात फक्त पाच विकेट घेतल्यात तसेच फक्त 116 धावा केल्या आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.