IPL 2022 GT vs CSK Live Streaming: जाणून घ्या गुजरात विरुद्ध चेन्नई सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेत उद्या (रविवारी) डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे.

IPL 2022 GT vs CSK Live Streaming: जाणून घ्या गुजरात विरुद्ध चेन्नई सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
GT vs CSK Live StreamingImage Credit source: Hardik Pandya / Twitter
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 8:00 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) स्पर्धेत उद्या (रविवारी) डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधला एक यशस्वी संघ आहे. चार वेळा त्यांनी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. ते गतविजेतेही आहेत. उद्या होणाऱ्या सामन्याआधी दोन्ही संघांचा फॉर्म लक्षात घेतला, तर गुजरात टायटन्सचं पारडं थोडं जड आहे. गुजरात टायन्सचा खेळ पाहून त्यांनी आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे असं अजिबात वाटत नाही. पाच पैकी चार सामने जिंकून पॉइंटस टेबलमध्ये ते अव्वल स्थानावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या संघाचा स्पर्धेच्या सुरुवातीपासून संघर्ष सुरु आहे. आतापर्यंत खेळल्या पाच सामन्यांपैकी त्यांनी एकमेव विजय मिळवला आहे. सलग चार परभवांना हा संघ सामोरा गेला.

हार्दिक पंड्याचा गुजरातचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात संतुलित आहे. गुजरात आणि चेन्नईची मॅच एकप्रकारे दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्समधील सामना असणार आहे. गुजरातचे नेतृत्व करणारा हार्दिक आणि चेन्नईचा रवींद्र जाडेजा दोघे अष्टपैलू खेळाडू आहेत. भारताच्या अनेक विजयांमध्ये दोघांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने योगदान दिलं आहे. दोन्ही संघांनी आपले मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. तीच विजयी लय कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 17 एप्रिल (रविवार) रोजी खेळवला जाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता

इतर बातम्या

IPL 2022 DC vs RCB Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, MI vs LSG : आज लखनौ मुंबईला रोखणार?, की इंडियन्सची विजयाची भूक यश खेचून नेणार?

IPL 2022, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवेळा पराभव, आज विजयश्री खेचून आणण्याची संधी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.