IPL 2022 Robin uthappa-Shivam Dubey: उथाप्पा-दुबेने फोडले फोर-सिक्सचे फटाके, सिराजच्या नो-बॉलवरुन नेटीझन्स खवळले
IPL 2022 Robin uthappa-Shivam Dubey: चेन्नई सुपर किंग्सने आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (CSK vs RCB) मोठ टार्गेट दिलं आहे. रॉबिन उथाप्पा (Robin uthappa) आणि शिवम दुबेने (Shivam Dubey) स्फोटक फलंदाजी केली.
मुंबई: चेन्नई सुपर किंग्सने आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (CSK vs RCB) मोठ टार्गेट दिलं आहे. रॉबिन उथाप्पा (Robin uthappa) आणि शिवम दुबेने (Shivam Dubey) स्फोटक फलंदाजी केली. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर चेन्नईने डोंगराएवढी विशाल धावसंख्या उभारली. चेन्नईने 20 षटकात चार बाद 216 धावा केल्या. ही या सीजनमधली सर्वात मोठी धावसंख्या आहे. शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पाने आरसीबीची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी अक्षरक्ष: मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी फोर-सिक्सचे फटाके फोडले. या दोघांना चेंडू कुठल्या टप्प्यावर टाकायचा हा प्रश्न आरसीबीच्या गोलंदाजांना पडला होता. शिवम दुबेने या सामन्यात वादळी खेळी केली. आयपीएलचा यंदाचा सीजन सुरु झाल्यापासून चेन्नईचा संघ फ्लॉप ठरतोय. पण शिवम दुबे प्रत्येक सामन्यात दमदार प्रदर्शन करतोय.
206.52 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी
आजच्या सामन्यातही हाच सिलसिला कायम राहिला. त्याने 46 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि आठ षटकार होते. शिवम दुबेने आज तुफान फटकेबाजी केली. अवघ्या पाच रन्सने त्याचं शतक हुकलं. 206.52 च्या स्ट्राइक रेटने त्याने फटकेबाजी केली. फलंदाजी करताना त्याने आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शिवम दुबे सातव्या ओव्हरमध्ये मैदानात आला. तेव्हापासून त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस सुरु झाला. आकाश दीपच्या चौथ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत शिवमने धमाका कायम ठेवला. 15 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन हाफ सेंच्युरी पूर्ण केली. 30 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं.
This really a no ball?.!Quality of umpires need to improve.! pic.twitter.com/9uV3ryMVb4
— Deep Point (@ittzz_spidey) April 5, 2022
रॉबिन ठरला संकटमोचक
दुसऱ्या बाजूला रॉबिन उथाप्पाही भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आज सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि मोइन अली लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर चेन्नईचा डाव अडचणीत येतोय की, काय असं वाटलं. पण रॉबिन उथाप्पा संकटमोचक ठरला. त्याने बिनधास्तपणे फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने 50 चेंडूत 88 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि नऊ षटकार होते. यंदाच्या सीजनमधल त्याने दुसरं अर्धशतक झळकावलं. याआधी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली होती.
Siraj bowls the ball properly gets hits for boundary when he gets wicket it will be no ball.
— Sai (@akakrcb6) April 12, 2022
नो बॉल रॉबिन उथाप्पाला नशिबाची साथ
ग्लेन मॅक्सवेलवर तर उथाप्पाने हल्लाबोल केला. त्याच्या एका ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकले. जोश हेझलवूड, वानिंदुं हसारंगाची गोलंदाजी त्याने फोडून काढली. उथाप्पा शतकाच्या दिशेने आगेकूच करत होता. त्यावेळी मोहम्मद सिराजच्या 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कॅच आऊट झाला. पण नशीब उथाप्पाच्या बाजूने होते. पंचांनी सिराजचा चेंडू नो बॉल ठरवला. त्यावेळी उथाप्पा 81 धावांवर होता. अखेर 19 व्या षटकात उथाप्पा आऊट झाला. पंचांनी सिराजचा जो चेंडू नो बॉल ठरवला. त्यावर सोशल मीडियावर दोन वेगवेगळे मत प्रवाह पहायला मिळत आहेत.