AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 GT vs DC Live Streaming: गुजरात टायटन्स वि दिल्ली कॅपिटल्स LIVE मॅच तुम्ही कधी, कुठे आणि कशी पाहू शकता?

IPL 2022 GT vs DC Live Streaming: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शनिवारी दोन मॅचेस होणार आहेत. दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Gujarat Titans vs Delhi Capitals) खेळला जाणार आहे.

IPL 2022 GT vs DC Live Streaming: गुजरात टायटन्स वि दिल्ली कॅपिटल्स LIVE मॅच तुम्ही कधी, कुठे आणि कशी पाहू शकता?
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत-रिकी पाँटिंग Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 3:35 PM

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शनिवारी दोन मॅचेस होणार आहेत. दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Gujarat Titans vs Delhi Capitals) खेळला जाणार आहे. दोन्ही टीम्सनी आपला सलामीचा सामना जिंकला आहे. गुजरात आणि दिल्लीमध्ये रोमांचक सामना पहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने मागच्या दोन सीजमध्ये दमदार प्रदर्शन केलं आहे. आयपीएलमधली नवीन टीम असलेल्या गुजरात टायटन्स बरोबर उद्या त्यांचा सामना होत आहे. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत कॅप्टन म्हणून परस्परासमोर येण्याची ही पहिली वेळ आहे.

दिल्ली कॅपिटल्सने सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स सारख्या बलाढ्य संघाला हरवलं होतं. विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 14 षटकात सहा बाद 104 अशी दिल्लीची स्थिती होती. त्या संकटातून ललित यादव आणि अक्षर पटेलने संघाला विजय मिळवून दिला. पाच षटकात 75 धावांची भागीदारी त्यांनी केली. दिल्ली कॅपिटल्सने चार विकेटने हा सामना जिंकला.

गुजरातनेही अटी-तटीच्या लढतीत मिळवला विजय

मोहम्मद शमी आणि राहुल तेवतिया यांच्या दमदार खेळाच्या बळावर गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला नमवलं होतं. मोहम्मद शमीने 25 धावात तीन विकेट आणि राहुल तेवतियाने 24 चेंडूत 40 धावा फटकावून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. लखनौ आणि गुजरात हे आयपीएलमधील दोन्ही नवीन संघ आहेत. लखनौने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट गमावून 158 धावा केल्या. गुजरातने दोन चेंडू बाकी असताना पाच विकेटवर 161 धावा करुन सामना जिंकला होता.

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना कधी होईल?

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात शनिवारी दोन एप्रिलला सामना होईल.

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये कुठे होणार सामना?

पुण्याच्या महाराष्ट्र असोशिएशनच्या स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना होईल.

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये किती वाजता सुरु होणार सामना ?

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामन्याचा टॉस संध्याकाळी सात वाजता होईल. पहिला डाव 7.30 वाजता पहिला डाव सुरु होईल.

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामन्याचं लाइव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल?

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान होणारा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनल्सवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकता.

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याचं ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पहाल?

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याचं ऑनलाइन लाइव स्ट्रीमिंग Disney+Hotstar वर पाहू शकता. त्याशिवाय मॅचेचं लाइव अपडेट्स Tv9marathi.com वर पाहू शकता.

'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.