Hardik wife Natasa stankovic: नताशाचा स्विमिंग पूलमधला VIDEO पाहून हार्दिक स्वत:ला रोखू शकला नाही, म्हणाला…
Hardik wife Natasa stankovic: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) स्टार क्रिकेटपटूंबरोबर त्यांच्या पत्नीही नेहमी चर्चेत असतात. साक्षी धोनी, रितिका सजदेह, अनुष्का शर्मा यांच्यावर मीडियाची नेहमीच नजर असते.
मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) स्टार क्रिकेटपटूंबरोबर त्यांच्या पत्नीही नेहमी चर्चेत असतात. साक्षी धोनी, रितिका सजदेह, अनुष्का शर्मा यांच्यावर मीडियाची नेहमीच नजर असते. सध्या हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) बायको नताश स्टँकोविकची (Natasa stankovic)अशीच चर्चा आहे. आयपीएल सामन्यांच्यावेळी नताशा स्टँकोविकची स्टेडियममधली उपस्थिती कॅमेऱ्याच लक्ष वेधून घेत आहे. गुजरात टायटन्सच्या लढतीवेळी नताशा नेहमी टीमसाठी चिअर करताना दिसते. नवरा हार्दिक पंड्यासह गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी चौकार-षटकार मारला किंवा विकेट काढला, की नताशाचा उत्साह दिसून येतो. स्टेडियमधल्या तिच्या अदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. हार्दिक पंड्या सध्या गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. त्यामुळे त्याच्या जय-पराजयाच्या छटा लगेच नताशाच्या चेहऱ्यावर उमटतात. सध्या गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेत चांगली कामिगिरी करतो.
हार्दिकसह नताशा सुद्धा आनंदात
आतापर्यंत त्यांनी दोन सामने खेळले असून दोन्ही लढती जिंकल्या आहेत. गुजरातने सर्वात आधी लखनौ सुपर जायंट्सचा त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. त्यामुळे हार्दिकसह नताशा सुद्धा आनंदात आहे.
व्हिडिओमुळे नताशा पुन्हा चर्चेत
नताशा स्टँकोविक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामागे कारण आहे, तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला स्विमिंग पूलमधला व्हिडिओ. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. नताशाचा या व्हिडिओत हॉट लूक दिसतोय.
हार्दिक पंड्याही स्वत:ला रोखू शकला नाही
हा व्हिडिओ पाहून हार्दिक पंड्याही स्वत:ला रोखू शकला नाही. कमेंटमध्ये त्याने हार्ट आणि फायरचा इमोजी टाकला आहे. नताशा स्टँकोविकच्या या व्हिडिओवर बऱ्याच कमेंटस आल्या आहेत. हार्दिक आणि नताशा हे सोशल मीडियावर सक्रीय असणारं जोडपं आहे. त्यांना एक मुलगाही आहे.
View this post on Instagram
हार्दिकच्या फॉर्मची अनेकांना चिंता
नताशा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हार्दिकशी लग्न करण्याआधी तिने म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आयपीएलचा हा 15 वा सीजन आहे. हा सीजन सुरु होण्याआधी हार्दिकच्या फॉर्मबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. कारण टी 20 वर्ल्डकप नंतर तो एकाही सामन्यात खेळला नव्हता. हार्दिक गोलंदाजी करु शकेल का? हा मुख्य प्रश्न होता. हार्दिकने NCA मध्ये यो-यो टेस्ट पास करुन आपला फिटनेस सिद्ध केला. त्याशिवाय यंदाच्या आयपीएलमध्ये तो गोलंदाजी सुद्धा करतोय. यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या दृष्टीने हार्दिकचा फिटनेस खूप महत्त्वाचा आहे.