‘इज्जत पण महत्त्वाची’, IPL 2022 च्या प्रश्नावर chris gayle चं रोखठोक उत्तर

गेलच्या मनात भरपूर राग भरला होता. त्याच रागापोटी त्याने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या ड्राफ्टमध्ये स्वत:च नाव नोंदवलं नाही. ड्राफ्ट (Draft) मध्ये नाव नसेल, तर फ्रेंचायजी विकत तरी कसे घेणार?

'इज्जत पण महत्त्वाची', IPL 2022 च्या प्रश्नावर chris gayle चं रोखठोक उत्तर
chris gayle ipl 2022
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 12:19 PM

मुंबई: तुमचं नाव कितीही मोठं असलं, तरी इज्जत खूप महत्त्वाची असते. प्रतिष्ठेनुसार, मान-सन्मान मिळाला नाही, तर वेदना होतात. ख्रिस गेल (Chris gayle) बरोबर सुद्धा असंच घडलं. गेलला आयपीएलमध्ये मान मिळाला नाही. ‘द मिरर’ दिलेल्या मुलाखतीत ख्रिस गेलने स्वत: हा खुलासा केला आहे. त्याने सगळ्याच गोष्टी या मुलाखतीत उलगडून सांगितल्या आहेत. मागची दोन वर्ष ख्रिस गेलला आयपीएलमध्ये खेळताना त्रास झाला. या दोन वर्षात जो त्रास झाला, त्यामुळे ख्रिस गेलला आतमधून खूप वेदना झाल्या, तो कोलमडून गेला होता. त्याच्या मनात भरपूर राग भरला होता. त्याच रागापोटी त्याने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या ड्राफ्टमध्ये स्वत:च नाव नोंदवलं नाही. ड्राफ्ट (Draft) मध्ये नाव नसेल, तर फ्रेंचायजी विकत तरी कसे घेणार?

आता प्रश्न आहे की, आयपीएलमध्ये ख्रिस गेल बरोबर असं काय घडलं? कशामुळे त्याला इतका त्रास झाला?

आयपीएलमध्ये चांगली वागणूक मिळाली नाही

“IPL 2022 मध्ये मागच्या दोन वर्षांपासून मला चांगली वागणूक मिळत नव्हती. तुम्ही ज्या खेळाला सर्व काही दिलं, तिथे तुम्हाला मान-सन्मान मिळाला नाही, तर त्रास होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच मी आयपीएल 2022 च्या ड्राफ्टमध्ये स्वत:च नाव नोंदवलं नाही” असं ख्रिस गेलने ‘द मिरर’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

कदाचित गेलला या गोष्टीचा जास्त त्रास झाला

IPL मध्ये मागच्या 14 वर्षात तीन टीम्सकडून खेळलेल्या या खेळाडूच्या कौशल्यावर व क्षमतेबद्दल कोणाच्याही मनात प्रश्न नाहीय. आयपीएलमधले अनेक रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहेत. पण मागच्या दोन वर्षात त्याच्याबरोबर जे झालं, त्यामुळे तो आतमधून कोलमडून गेला होता. मागच्या दोन वर्षात ख्रिस गेलला खेळण्याची जास्त संधी मिळत नव्हती. प्लेइंग इलेवनमध्ये कधी संधी मिळायची, कधी बाहेर बसवलं जायचं. गेलने या सगळ्याकडे आपल्यावर अन्याय होतोय, या भावनेतून बघितलं. त्यामुळेच ख्रिस गेलने यंदाच्या मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवणं टाळलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.