IPL 2022 KKR vs GT Prediction Playing XI : गुजरातच्या कर्णधाराचं कमबॅक!, कप्तान श्रेयस व्येंकटेश अय्यरला विश्रांती देणार?
आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शनिवारी (23 एप्रिल) डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. या दिवशी चाहत्यांना एका दिवसात दोन थ्रिलर सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. यापैकी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात खेळवला जाईल
मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शनिवारी (23 एप्रिल) डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. या दिवशी चाहत्यांना एका दिवसात दोन थ्रिलर सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. यापैकी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात खेळवला जाईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. कोलकात्याने मागील दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून गमावले आहेत. याउलट लीगमधील अव्वल संघ गुजरात टायटन्सने मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ सुसाट वेगाने धावत आहे. मागील सामन्यात कर्णधाराच्या अनुपस्थितीतदेखील गुजरातने विजय मिळवला. त्यामुळे हा संघ मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गुजरातला सनरायझर्स हैदराबादकडून मोसमातील पहिला पराभव मिळाला, त्यानंतर या संघाने आधी राजस्थान रॉयल्स आणि नंतर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होता. या सामन्यात हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र डेव्हिड मिलरने 94 धावांची खेळी खेळून संघाची विजयश्री खेचून आणली. हार्दिकच्या अनुपस्थितीत फिरकीपटू राशिद खानने (40 धावा) संघाची धुरा सांभाळली. गुजरातच्या संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी पाच जिंकले असून गुणतालिकेत हा संघ अव्वल स्थानावर आहे. तर कोलकात्याचा संघ गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे.
व्येंकटेश अय्यरला विश्रांती
गुजरातविरुद्धच्या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर सलामीवीर व्येंकेटश अय्यरला विश्रांती देऊ शकतो. व्येंकटेशने मागील 6 सामन्यापैकी एकाही सामन्यात मोठी खेळी खेळलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला शेवटच्या सामन्यात अॅरॉन फिंचने आपल्या बॅटची जादू दाखवली. त्यामुळे तो पहिला सलामीवीर असेल. त्याच्यासोबत सुनील नारायणला सलामीला संधी मिळू शकतो. तसेच संघात व्येंकटेशच्या जागी रिंकू सिंहला संधी दिली जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला अल्झारी जोसेफला विश्रांती देऊन त्याच्या जागी कर्णधार हार्दिक पंड्याची गुजरातच्या संघात वापसी पाहायला मिळू शकते.
कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
अॅरॉन फिंच, वेंकटेश अय्यर/रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नारायण, पॅट कमिंस, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल
इतर बातम्या
MI vs CSK IPL 2022: अरेरे, Rohit Sharma च्या नावावर IPL मधल्या सर्वात खराब रेकॉर्डची नोंद
MI vs CSK IPL 2022: इशान किशन खाली पडला, मुकेश चौधरीच्या जबरदस्त यॉर्करवर विकेट, Watch VIDEO