IPL 2022: Mumbai Indians चा शत्रू नंबर 1, आधी 15 बॉलमध्ये सामना संपवला, आता एका षटकात केला गेम ओव्हर

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. अशी हालत कधीच झाली नव्हती. आयपीएलमधल्या सर्वात यशस्वी संघाला एकाच सीजनमध्ये नऊ पराभव पहावे लागले.

IPL 2022: Mumbai Indians चा शत्रू नंबर 1, आधी 15 बॉलमध्ये सामना संपवला, आता एका षटकात केला गेम ओव्हर
IPL 2022: MI vs KKRImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 1:17 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. अशी हालत कधीच झाली नव्हती. आयपीएलमधल्या सर्वात यशस्वी संघाला एकाच सीजनमध्ये नऊ पराभव पहावे लागले. काल कोलकात नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 52 धावांनी विजय मिळवला. सलग आठ पराभवानंतर मुंबईची ही 9 वी हार आहे. यंदाच्या सीजनमध्ये केकेआरकडून मुंबईच्या टीमचा सलग दुसरा पराभव झाला. हे दोन्ही सामने केकेआरने मोठ्या फरकाने जिंकले आणि एका खेळाडूने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पॅट कमिन्स (Pat Cummins) हाच खेळाडू मुंबईच्या मार्गात मुख्य अडसर ठरला. पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध केलेलं प्रदर्शन पाहता, त्याला मुंबईचं दुश्मन नंबर 1 म्हटल्यास चुकीच ठरणार नाही.

30 चेंडूतलं काम त्याने 6 बॉलमध्ये करुन टाकलं

IPL 2022 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्स आणि केकेआरचा संघ आमने-सामने आला, त्यावेळी पॅट कमिन्स 15 चेंडूत वादळी खेळी केली. मुंबईच्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये 35 धावांची गरज होती. कमिन्सने या सामन्यात आपला आक्रमक अंदाज दाखवला. त्याला 30 चेंडूत ज्या धावा बनवायच्या होत्या, ते काम त्याने 6 चेंडूत करुन टाकलं. 16 वं षटक टाकणाऱ्या डॅनियल सॅम्सच्या ओव्हरमध्ये त्याने चार षटकार आणि दोन चौकार खेचले. एका नो बॉलवर 3 धावा मिळाल्या. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावून केकेआरला मोठा विजय मिळवून दिला.

मुंबई विरुद्धच विशेष कामगिरी

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही पॅट कमिन्सने अशीच कामगिरी केली. त्याने यावेळी हे काम बॅटने नाही, तर बॉलने केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध 9 मे रोजी झालेल्या सामन्यात कमिन्सने एका ओव्हरमध्ये खेळ पालटला. मुंबईचा डाव सुरु असताना कमिन्स 15 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या. इशान किशनने हाफ सेंच्युरी झळकवली होती. कमिन्सने त्याला झेलबाद केलं. त्यानतंर त्याने आणखी दोन विकेट घेतल्या. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. कमिन्सने मुंबई विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात चार ओव्हर्समध्ये 22 धावा देत तीन विकेट घेतल्या.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.