IPL 2022, LSG vs RCB , Purple Cap : बँगलोरचा लखनौवर मोठा विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. यानंतर पर्पल कॅपच्या यादीत काही बदल झाले आहेत का, पाहुया

IPL 2022, LSG vs RCB , Purple Cap : बँगलोरचा लखनौवर मोठा विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?
युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप कायमImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 7:59 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. त्यांनी लखनौ सुपर जायंट्स संघाला हरवलं. आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. RCB ने लखनौला (LSG) 18 धावांनी हरवलं. आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसी आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने विजयात महत्त्वची भूमिका बजावली. डू प्लेसीने (Faf du Plessis) चार बाद 62 अशा स्थितीतून डाव सावरला. त्याच्या 96 धावांच्या खेळीच्या बळावर RCB ने 181 धावांपर्यंत मजल मारली. बँगलोरने लखनौला विजयासाठी 182 धावांचे टार्गेट दिले होते. त्यांनी निर्धारीत 20 षटकात 8 बाद 163 धावा केल्या. जोश हेझलवूडने लखनौला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार षटकात 25 धावा देत चार विकेट घेतल्या. यानंतर पर्पल कॅपच्या यादीत काही बदल झाले आहेत का, पाहुया

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

युझवेंद्र चहल पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 17 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टी नटराजन आहे. नटराजनने 12 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी कुलदीप यादव आहे. कुलदीपने अकरा विकेट आतापर्यंत आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी आवेश खान आहे. त्यानेही अकरा विकेट घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने देखील अकरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

फॅन्सनी सोशल मीडियावर संताप

शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विराट रनआऊट झाला. त्यानंतर फॅन्सनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. सलामीवीर अनुज रावतने दुष्मंथा चमीराला पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार मारला होता. पण चमीराने पाचव्या चेंडूवर रावतला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पुढच्याच चेंडूवर चमीराने विराट कोहलील बाद केलं. विराट कोहली आणि अनुज रावत दोघेही एकाच गुरुचे चेले आहेत. विराट कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनीच अनुज रावतलाही क्रिकेटचे धडे दिलेत. दोघेही वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमीतून येतात. पहिल्याच ओव्हरमध्ये चमीराने दोघांना पाठोपाठ तंबूत पाठवलं.

इतर बातम्या

Sher Shivraj: ‘शेर शिवराज’मध्ये घडणार शिवरायांच्या अद्भुत गुणांचं, अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन

unseasonal rains : बेळगावात अवकाळी पावसाचा तडाखा; झाड कोसळून एकाचा मृत्यू

Nashik: नाशिक येथील सोमेश्वर धबधब्यावर दोघे बुडाले, धबधब्याच्या पाण्यात पोहणं जीवावर बेतलं!

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.