LSG vs SRH IPL Match Result: विजयासाठी 18 चेंडूत 33 धावा, स्ट्राइकवर होता धोकादायक पूरन, गंभीर आवेशला एवढचं म्हणाला ‘तू तुझा…’
LSG vs SRH IPL Match Result: मागच्या सीजनमध्ये आवेश खान (Avesh Khan) एनरिच नॉर्खिया, कागिसो रबाडा, आर अश्विन आणि अक्सर पटेल या दिग्गज गोलंदाजांसोबत दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघातून खेळला होता.
मुंबई: मागच्या सीजनमध्ये आवेश खान (Avesh Khan) एनरिच नॉर्खिया, कागिसो रबाडा, आर अश्विन आणि अक्सर पटेल या दिग्गज गोलंदाजांसोबत दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघातून खेळला होता. दिल्लीकडे ऐवढे मोठे गोलंदाज असूनही आवेश खानने आपली छाप उमटवली होती. हर्षल पटेल पाठोपाठ त्याने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळेच यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर मोठी बोली लागली. लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) तब्बल 10 कोटी रुपये मोजून आवेश खानला आपल्या ताफ्यात घेतलं. काल सनराजयर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आवेश खाननेही त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. आवेशने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात लखनौकडून डेब्यु केला. शेवटच्या षटकात टायटन्सला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती. पण आवेशला त्यांना विजयापासून दूर ठेवता आले नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. “मला माहितीय आयपीएलमध्ये 14 सामने आहेत. पुन्हा एकदा संधी मिळेल. म्हणूनच मी तयार आहे” असे आवेशने त्यावेळी सांगितले होते.
स्लोअर चेंडूवर विलियमसनला फसवलं
काल सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याला ती संधी मिळाली. आवेशने सुरुवातीच्या षटकांमध्ये SRH चा कॅप्टन केन विलियमसन आणि अभिषेक शर्माची विकेट काढून सामन्यात लखनौची स्थिती बळकट केली. आवेशने एका स्लोअर चेंडूवर विलियमसनला फसवलं. स्कूप करण्याच्या नादात त्याने सोपा झेल दिला.
‘तू तुझा सर्वोत्तम चेंडू टाक’
त्यानंतर स्ट्रॅटजिक टाइम आऊटमध्ये लखनौ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आवेशचा आत्मविश्वास वाढवला. तुला टीमला मॅच जिंकून द्यायची आहे, असं गंभीरने आवेशला सांगितलं. ‘तू तुझा सर्वोत्तम चेंडू टाक’ एवढचं गंभीर आवेशला म्हणाला. तू आमचा मुख्य गोलंदाज आहेस. तू आम्हाला मॅचेस जिंकून देणार, असं गौतम भाई, अँडी बिचेल, अँडी फ्लावर, केएल राहुल मला नेहमी सांगत असतात, असं आवेश म्हणाला.
We asked him what was up his sleeve and he said ONE MORE! Its 4!@Avesh_6 is on a roll.#AbApniBaariHai #bhaukaalmachadenge#IPL2022 ? #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/uEQVzidagK
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 4, 2022
स्ट्राइकवर धोकादायक निकोलस पूरन होता
आवेश खान लखनौकडून 18 व षटक टाकत होता. त्यावेळी सनरायजर्स हैदराबादला 18 चेंडूत 33 धावांची आवश्यकता होती. इतक्या धावा टी-20 क्रिकेटमध्ये सहज होतात. स्ट्राइकवर धोकादायक निकोलस पूरन होता. सहा विकेट शिल्लक होत्या. पूरनने आवेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर आवशेच्या तिसऱ्या फुलटॉस चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात पूरनने दीपक हुड्डाकडे झेल दिला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर आवेशने अब्दुल समदला यॉर्करवर क्विंटन डि कॉक करवी झेलबाद केलं. तिथेच सामना हैदराबादच्या बाजूने फिरला. चार षटकात 24 धावा देऊन चार विकेट काढल्या.