IPL 2022: महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांचं स्टेडियमवरील IPL सामन्यांसंदर्भात महत्त्वाचं विधान
महाराष्ट्रात कोविडची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल, जेणेकरुन प्रेक्षकांना IPL चे सामने पहण्यासाठी स्टेडियमवर परवानगी देता येईल, अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.
मुंबई: महाराष्ट्रात कोविडची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल, जेणेकरुन प्रेक्षकांना IPL चे सामने पहण्यासाठी स्टेडियमवर परवानगी देता येईल, अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली. इंडियन प्रिमियर लीगचा यंदाचा 15 वा हंगाम महाराष्ट्रात आयोजित होणार आहे. मुंबई आणि पुण्यात IPL चे सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, (Wankhede Stadium) डीवाय पाटील (Dy Patil) आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. येत्या 26 फेब्रुवारीपासून IPL चे सामने सुरु होणार आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. मुक्त वातावरण आहे. आयपीएल सामने ज्यावेळी होतील, त्यावेळी सर्व प्रेक्षकांना स्टेडियमवर परवानगी देता येईल, असे वातावरण असावे, अशी अपेक्षा सुनील केदार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
लोकांना एकत्र येण्याची एक चांगली संधी
“प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्यास खेळाडूंचा उत्साह वाढेल. लोकांना एकत्र येण्याची ही एक चांगली संधी आहे. मागच्या एक-दीड वर्षापासून लोक त्यांच्या घरी बसले आहेत” असे केदार म्हणाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार
सर्व 10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार आहेत. 14 मधले सात सामने घरच्या मैदानावर तर सात दुसऱ्या मैदानावर होतील. लीगमध्ये यंदा 60 ऐवजी 74 सामने होतील. प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने खेळेल. चार संघ फक्त एक-एक सामना खेळतील. लीग राऊंडनंतर चार प्लेऑफचे सामने होतील. पण त्यांचं स्थळ आणि तारीख जाहीर झालेली नाही.
IPL 2022 Maharashtra Sports Minister Sunil Kedar hopeful of crowds being allowed in stadiums