MI vs RR Playing XI IPL 2022: MI च्या टीममध्ये उद्या दोन बदल, कशी असेल प्लेइंग इलेवन, राजस्थानचे कुठले खेळाडू मुंबईसाठी धोकादायक

MI vs RR Playing XI IPL 2022: आयपीएल (IPL) मध्ये सर्वाधिक पाच विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सामना उद्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध (Mumbai Indians vs Rajasthan Royals) होत आहे.

MI vs RR Playing XI IPL 2022: MI च्या टीममध्ये उद्या दोन बदल, कशी असेल प्लेइंग इलेवन, राजस्थानचे कुठले खेळाडू मुंबईसाठी धोकादायक
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 4:32 PM

मुंबई: आयपीएल (IPL) मध्ये सर्वाधिक पाच विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सामना उद्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध (Mumbai Indians vs Rajasthan Royals) होत आहे. या स्पर्धेत मुंबईला अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. त्याचवेळी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा सहज पराभव केला होता. मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या सलामीच्या सामन्यात जिंकण्याच्या स्थितीमध्ये होता. पण ललित उपाध्याय आणि अक्षर पटेलने अखेरच्या षटकांमध्ये खेळ फिरवला. मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास त्यांनी हिरावला. राजस्थानला आपला पहिला सामना जिंकण्यात कुठलीही अडचण आली नाही. त्यांनी सहज विजय संपादन केला. मुंबई इंडियन्स उद्याचा राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना जिंकून विजयाचं खात उघडण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी संजू सॅमसनचा संघ पहिल्या सामन्यात जसा धडाकेबाज खेळ दाखवला होता, तेच प्रदर्शन कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

उद्याच्या सामन्यात होऊ शकतात दोन बदल

दोन्ही टीम्सच्या प्लेइंग इलेवन बद्दल बोलायचं झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी एक जमेची बाजू आहे. सूर्यकुमार यादव उद्याच्या सामन्यात खेळू शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सची मधली फळी बळकट होणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत सूर्युकमार यादवला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून न सावरल्यामुळे सूर्यकुमार दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. अनमोलप्रीत सिंहच्या जागेवर सूर्यकुमारला संघात स्थान दिले जाईल.

कुठल्या गोलंदाजाला बाहेर करणार?

गोलंदाजीमध्ये डॅनियल सॅम्सच्या जागीही दुसऱ्या खेळाडूचा समावेश केला जाऊ शकतो. मागच्या सामन्यात डॅनियल सॅम्स महागडा गोलंदाज ठरला होता. त्याच्या चार षटकात 14.25 च्या सरासरीने 57 धावा फटकावण्यात आल्या होत्या. एकही विकेट त्याला मिळाली नव्हती.

राजस्थानमध्ये बदलाची शक्यता कमी

पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात दमदार कामगिरी केली होती. जोस बटलरसह संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कलने सुंदर फलंदाजी केली होती. गोलंदाजीत ट्रेंट बोल्टसह युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विनने कमालीची गोलंदाजी केली होती.

दोन्ही टीम्सची Playing XI

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बासिल थंपी,

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायेर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, जोस बटलर, रविचंद्रन अश्विन, नाथन कुल्टर नाइल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल,

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.