IPL 2022: गुजरात टायटन्स नंतर Mumbai Indians आणखी तीन टीम्सचा खेळ बिघडवू शकते, रोहित सेना दुसऱ्या संघासाठी बनली डेंजरस

IPL 2022: बलाढ्य गुजरात विरुद्ध मुंबईने विजय मिळवला. मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. पण हा संघ दुसऱ्या टीम्सच गणित मात्र बिघडवू शकतो.

IPL 2022: गुजरात टायटन्स नंतर Mumbai Indians आणखी तीन टीम्सचा खेळ बिघडवू शकते, रोहित सेना दुसऱ्या संघासाठी बनली डेंजरस
mumbai Indians Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 3:11 PM

मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील एक यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या टीमने पाच वेळा IPL चं विजेतेपद मिळवलं आहे. पण या टीमसाठी आयपीएलचा यंदाचा सीजन सर्वात खराब ठरला आहे. सलग आठ पराभवांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ शर्यतीत (Playoff Race) बाहेर गेला. नवव्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्सला या सीजनमधला पहिला विजय मिळला. त्यानंतर कालही बलाढ्य गुजरात विरुद्ध मुंबईने विजय मिळवला. मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. पण हा संघ दुसऱ्या टीम्सच गणित मात्र बिघडवू शकतो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. आठमध्ये पराभव तर दोन मॅचमध्ये विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्सचे अजून चार सामने बाकी आहेत. ज्या संघांविरुद्ध या मॅचेस खेळायच्या आहेत, त्या टीम्स प्लेऑफसाठी दावेदार आहेत. अशा परिस्थिती मुंबई त्या टीम्ससाठी धोकादायक ठरु शकते.

सध्याच्या पोझिशननुसार काय गणित आहे?

मुंबईला पुढचे चार सामने कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळायचे आहेत. चेन्नईचा संघही मुंबई प्रमाणे प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेला आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा विशेष काही फरक पडणार नाही. पण कोलकाता, दिल्ली आणि SRH प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. पॉइंटस टेबलमधली सध्याची पोझिशन बघितली, तर दिल्ली कॅपिटल्स 10 सामन्यात पाच विजय आणि पाच पराभवासह एकूण 10 गुण मिळवून पाचव्या स्थानावर आहे. हैदराबादचे आकडे सुद्धा दिल्ली सारखेच आहेत. पण नेट रनरेट कमी असल्याने ते सहाव्या स्थानावर आहेत. कोलकाता 10 सामन्यात चार विजय आठ पॉइंटसह आठव्या नंबरवर आहे.

मुंबईच्या प्रदर्शनावर तिघांचं भवितव्य

मुंबईने या तिन्ही टीम्सना हरवलं, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर होईल. दिल्लीला अजून चार सामने खेळायचे असून त्यांना कमीत कमी तीन विजय आवश्यक आहेत. मुंबईकडून दिल्लीचा पराभव झाला, तर त्यांचा मार्ग अजून खडतर होईल. हैदराबादची पण हीच स्थिती आहे. कोलकाताला आपले सर्व सामने जिंकावेच लागतील. मुंबईकडून पराभूत झाल्यास त्यांच्या प्लेऑफच्या स्वप्नांना मोठा धक्का बसू शकतो.

मुंबई आता विजयी मार्गावर परतली आहे. मागच्या दोन सामन्यात मुंबईने दमदार कामगिरी केली आहे. जास्तीत जास्त सामने जिंकून या सीजनचा चांगला शेवट करण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल.

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.