IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये CSK चा संघ नाही, जाणून घ्या कुठल्या आधारावर दोन गटात झाली संघ विभागणी

BCCI ने शुक्रवारी IPL 2022 चं शेड्यूल जाहीर केलं. आयपीएलचं 15 वा सीजन 26 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएलची फायनल 29 मे रोजी खेळवली जाईल.

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये CSK चा संघ नाही, जाणून घ्या कुठल्या आधारावर दोन गटात झाली संघ विभागणी
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 5:27 PM

मुंबई: BCCI ने शुक्रवारी IPL 2022 चं शेड्यूल जाहीर केलं. आयपीएलचं 15 वा सीजन 26 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएलची फायनल 29 मे रोजी खेळवली जाईल. कोरोनामुळे सर्व सामने महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले आहेत. मुंबई-पुण्यात सर्व सामने होतील. आठ ऐवजी दहा ठिकाणी सामने होणार आहेत. त्यामुळे यंदा लीगच्या फॉर्मेटमध्ये मोठे बदल झाले आहेत. आयपीएल टीम्समध्ये यंदा रॉबिन राऊंड पद्धतीने सामने होणार नाहीत. ग्रुप स्टेजमध्ये सामने होतील. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्सच्या समावेशानंतर लीगमध्ये आता 10 संघ झाले आहेत. दहा संघांची प्रत्येकी पाच-पाचच्या दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली याहे. प्रत्येक संघाला नऊ संघांविरुद्ध सामना खेळायचा आहे. पण कुठल्या संघाचे कोणाविरुद्ध किती सामने होणार हे ग्रुपच्या हिशोबाने निश्चित होईल. ग्रुपच्या विभागाणीसाठी बीसीसीआयने खास पद्धत अवलंबली आहे.

पहिल्या ग्रुपमध्ये कोण? दुसऱ्या ग्रुपमध्ये कोण?

आयपीएलच्या पहिल्या ग्रुपमध्ये (IPL 2022 Groups) मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत.

ग्रुपसाठी संघ कुठल्या आधारावर निवडण्यात आले?

आयपीलमधल्या पहिल्या आठ संघांनी किती जेतेपद मिळवली आहेत. कितीवेळा ते फायनलमध्ये पोहोचले आहेत. या आधारावर बीसीसीआयने ग्रुपमध्ये विभागणी केली आहे. मुंबई इंडियन्सने सर्वाधिक जेतेपद पटकावली आहेत. त्यांनी पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर चेन्नईचा नंबर लागतो. CSK ने चार जेतेपद मिळवली आहेत. त्यामुळेच या दोन्ही संघांना वेगवगेळ्या गटांमध्ये ठेवलं आहे.

कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान संघासाठी सुद्धा तोच आधार लावण्यात आला आहे. हैदराबादने दोन फायनल सामने खेळले आहेत. त्यासाठी यादीत त्यांना राजस्थानच्या वर स्थान देण्यात आलं आहे. त्यानंतर दिल्ली-पंजाबचा संघ प्रत्येकी एकदा फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना ‘एल्फाबेटिकल ऑर्डर’ म्हणजे नावाच्या सुरुवातीच्या अक्षराच्या आधारावर स्थान देण्यात आलं आहे. लखनऊ आणि गुजरातच्या बाबतीत किंमतीच्या आधार मानण्यात आलं आहे.

ipl 2022 mumbai indians chennai super kings not in same group know how bcci choose groups

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.