IPL 2022: Mumbai Indians चे कोच माहेला जयवर्धने अडचणीत, राष्ट्रीय कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

IPL 2022: इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेत (IPL) भारताबरोबरच अन्य देशातील क्रिकेटपटूंच्या टॅलेंटलाही वाव मिळतो. अन्य देशातील क्रिकेटपटूही या स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवतात.

IPL 2022: Mumbai Indians चे कोच माहेला जयवर्धने अडचणीत, राष्ट्रीय कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 11:13 AM

IPL 2022: इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेत (IPL) भारताबरोबरच अन्य देशातील क्रिकेटपटूंच्या टॅलेंटलाही वाव मिळतो. अन्य देशातील क्रिकेटपटूही या स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवतात. आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे काही क्रिकेटपटूंवर त्या-त्या देशातील मीडियाकडून टीका होते. खासकरुन इंग्लंड-ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर (England-Australia Cricketers) अशी बरीच टीका होते. Ashes मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा दारुण पराभव झाला होता. त्यावेळी इंग्लिश मीडिया आणि त्या देशातील क्रिकेट तज्ज्ञांनी आयपीएलला जबाबदार धरलं होतं. त्यामुळे यंदा बऱ्याचशा इंग्लिश क्रिकेटपटूंना आयपीएलमधून माघार घेतली आहे. देश विरुद्ध आयपीएल असा वाद बऱ्याचदा रंगतो. आयपीएल स्पर्धेला प्राधान्य दिल्यामुळे अन्य देशात क्रिकेटपटूंच्या थेट देशप्रेमावरच शंका व्यक्त केली जाते. आतापर्यंत खेळाडूंपर्यंत हा विषय मर्यादीत होता. पण आता सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींच्या एकनिष्ठतेबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे.

आयपीएल स्पर्धेला प्राधान्य देत असल्याचा आरोप

श्रीलंकेचे महान खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचे कोच माहेला जयवर्धने यांच्यावरही आता आयपीएल स्पर्धेला प्राधान्य देत असल्याचा आरोप होतोय. जयवर्धने श्रीलंकन क्रिकेट संघासाठीही सल्लागार कोचची भूमिका बजावतात. राष्ट्रीय संघाबद्दलच्या त्यांच्या कटिबद्धतेबद्दल आता प्रश्न विचारण्यात येत आहे. इनसाइड स्पोटर्सने हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रीय संघाबद्दल कटिबद्धतेवर प्रश्नचिन्ह

एक जानेवारी 2022 रोजी जयवर्धने यांची श्रीलंकन संघाचे सल्लागार कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली. सल्लागार कोच म्हणून श्रीलंकन खेळाडूंना मार्गदर्शन, रणनिती आखण्यामध्ये योग्य सल्ला अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे. क्रिकेटवर लिखाण करणारे प्रसिद्ध लेखक रॅक्स क्लेमेन्टाइन यांनी एका लेखात मेहला जयवर्धनेच्या राष्ट्रीय संघाबद्दल कटिबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ते ड्रेसिंग रुममध्ये नव्हते

“भारत आणि ऑस्ट्रेलिया हे अवघड दौरे होते. त्यावेळी माहेला जयवर्धनेची खेळाडूंना जास्त आवश्यकता होती. पण ते ड्रेसिंग रुममध्ये नव्हते. त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करणं आवश्यक होतं. निश्चितच अंबानी आयपीएलच्या मध्यावर त्यांना ब्रेक घेऊ देणार नाही” असे क्लेमेन्टाइन यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. श्रीलंकेच्या काही माजी क्रिकेटपटूंनाही मेहला जयवर्धनेकडून राष्ट्रीय कर्तव्याकडे होणारं दुर्लक्ष पटलेलं नाही. आयपीएलचा मोसम सुरु झाल्यानंतर माहेला जयवर्धने, कुमार संगकारा हे पूर्णवेळ त्यांच्या-त्यांच्या संघांसाठी सेवा बजावतील. जयवर्धने मुंबईसाठी तर संगकार राजस्थान रॉयल्सला आपली सेवा देणार आहे.

IPL 2022 Mumbai Indians coach Mahela Jayawardene in trouble fans & Sri Lankan media questions his committment for Sri Lanka Cricket

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.