IPL 2022, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवेळा पराभव, आज विजयश्री खेचून आणण्याची संधी

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला आणि त्यांच्या खेळाडुंना नेमकं काय झालंय, हे क्रिकेट चाहत्यांना कळत नाहीये. आतापर्यंत आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदी राहिलेल्या इंडियन्सला आतापर्यंत खेळवलेल्या पाच सामन्यात एकदाही यश आलेलं नाही.  त्यामुळे आज लखनौ विरुद्ध होणाऱ्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

IPL 2022, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवेळा पराभव, आज विजयश्री खेचून आणण्याची संधी
मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्मा Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 7:00 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आणि त्यांच्या खेळाडुंना नेमकं काय झालंय. हे क्रिकेट चाहत्यांना अद्यापही कळायला मार्ग नाही. आतापर्यंत आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदी राहिलेल्या इंडियन्सला आतापर्यंत खेळवलेल्या पाच सामन्यात एकदाही यश आलेलं नाही.  सलग पाच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत तो अखेरच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सचा आज लखनौ सुपर जायंट्ससोबत (LSG) सामना होतो आहे. लखनौ आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. लखनौने एकूण पाच सामने आतापर्यंत खेळले आहेत. त्यापैकी तीन जिंकले आहेत. तर दोन सामन्यात लखनौला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात लखनौ पुन्हा मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या गुणतालिकेत खातं उघडण्यापासून रोखणार की मुंबई इंडियन्स आयपीएलच्या गुणतालिकेत आपलं खातं उघडणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

तो फॉर्म्यूला इंडियन्ससाठी उपयोगी?

सलग पाच सामने हरलेल्या मुंबई संघाला आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचायचं आहे तर इंडियन्सला 2015चा फॉर्म्यूला वापरावा लागेल. त्यावेळी देखील इंडियन्स पहिल्या सहा सामन्यात सुरुवातीला फक्त एकच सामना जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्माच्याच नेतृत्वात संघाने चांगला विजय मिळवला होता. प्लेऑफ पोहचून त्यावेळी इंडियन्सने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं होतं. तो फॉर्म्यूला यंदा वापरल्यास इंडियन्स पुढील सामने सहज जिंकू शकतो. मुंबई इंडियन्स उरलेले नऊ सामन्यातील एक किंवा दोन सामने पराजीत होत असेल तर इंडियन्सला नेट रनरेट आणि इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून रहावं लागेल.

इंडियन्स गुणतालिकेत शेवटी

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आतापर्यंत पाचवेळा जेतेपदी राहिलेल्या इंडियन्सला यंदा खेळवलेल्या पाच सामन्यात एकदाही यश आलेलं नाही.  सलग पाच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत तो अखेरच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.

संघ ताळाला पण विजय शक्य

अजूनही मुंबई इंडियन्स संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम अजूनही चाचपडतेय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला आजच्या सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सर्वात तळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्थितीवर कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे आजचं वास्तव आहे. त्यामुळे आजच्या कामगिरीकडे गुणतालिकेतील भविष्य अवलंबून आहे.

मुंबई इंडियन्सचे प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियर सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी.

इतर बातम्या

Praveen Kalme : प्रवीण कलमेंना 100 कोटींचं टार्गेट होतं, ते म्हाडातले ‘सचिन वाझे’, सोमय्यांच्या आरोपावर पहिल्यांदाच कलमेंची बाजू वाचा

Health Tips : हलासन करा, मणक्याच्या आणि पाठीच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळवा!

Praveen Kalme : मला आजच कळतंय की माझ्याविरोधात FIR, मी आखाती देशात, सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे अवतरले

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.