IPL 2022 Mumbai Indians Jasprit Bumrah ला काय झालय? इतकी वाईट बॉलिंग त्याने कशी केली?

IPL 2022 Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत काल दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Mumbai Indians vs Delhi Capital) झाला.

IPL 2022 Mumbai Indians Jasprit Bumrah ला काय झालय? इतकी वाईट बॉलिंग त्याने कशी केली?
IPL 2022 मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराह Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 8:45 AM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत काल दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Mumbai Indians vs Delhi Capital) झाला. या रोमांचक सामन्यात दिल्लीने मुंबईवर चार गडी राखून आरामात मात केली. खरंतर एकवेळ असं वाटत होत की, मुंबई हा सामना सहज जिंकेल. मुंबईने जिंकायचा सामना हरला, असं म्हटल्यास चुकीच होणार नाही. ललित यादव (Lalit Yadav) आणि अक्षर पटेल (Akshar patel) दिल्लीच्या विजयाचे हिरो ठरले. त्यांनी सातव्या विकेटसाठी 30 चेंडूत नाबाद 75 धावांची भागीदारी केली. ललित-अक्षरने मुंबईची गोलंदाजी अक्षरक्ष: फोडून काढली. कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीला गोलंदाजीत चांगले बदल केले. त्यामुळे दिल्लीच्या टीमला बॅकफूटवर ढकलता आलं. शार्दुल ठाकूर बाद झाला, त्यावेळी दिल्लीची अवस्था सहाबाद 104 अशी होती. पण अखेरीस त्यांनी 10 चेंडू राखून विजय मिळवला.

तो काल का निष्प्रभ वाटला?

कालच्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहने खूप खराब गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराह मुंबईचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्यावर बरच काही अवलंबून आहे. फक्त मुंबई इंडियन्सच नाही, टीम इंडियाकडून खेळतानाही त्याने मोक्याच्या क्षणी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. संघाला गरज असताना, बुमराहने निराश केल्याची फार कमी उदहारण आहेत. हाच जसप्रीत बुमराह काल निष्प्रभ वाटला. त्याच्या गोलंदाजीत ती भेदकता, दाहकता जाणवली नाही. गोलंदाजी करताना त्याचा सूर हरवलाय असं दिसत होतं. जसप्रीत बुमराह भारतीय संघाप्रमाणे मुंबई इंडियन्समध्येही गोलंदाजी चमूच नेतृत्व करतो. त्याने फॉर्ममध्ये परतणं खूप आवश्यक आहे. अन्यथा मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील मार्ग खडतर बनू शकतो.

20 चेंडूत चोपल्या 43 धावा

जसप्रीत बुमराह काल महागडा गोलंदाज ठरला. दिल्लीच्या फलंदाजांनी त्याच्या 3.2 षटकात 43 धावा चोपल्या. खूप सहजतेने दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज बुमराहची गोलंदाजी खेळत होते. बुमराह गोलंदाजी करताना ती दहशत दिसली नाही. बुमराहला काल एकही विकेट मिळाली नाही.

‘द लीजेंड ऑफ जसप्रीत बुमराह’

जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्ससोबत दहावर्ष पूर्ण झाली आहेत. फ्रेंचायजीने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर दहावर्ष पूर्ण झाल्याबद्दल बुमराहला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘द लीजेंड ऑफ जसप्रीत बुमराह’ असे त्यांनी शीषर्क या व्हिडिओला दिलं आहे. जसप्रीत बुमराहने 2013 साली वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई इंडियन्ससाठी डेब्यू केला होता. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध तो मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात त्याने 32 धावा देत तीन विकेट काढल्या होत्या.  बुमराहने विराट कोहलीला आऊट करुन आपली पहिली विकेट घेतली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.