IPL 2022, PBKS vs RR: जोस बटलर कुठला शॉट खेळायला गेला, OUT कसा झाला? एकदा हा Video बघा
IPL 2022, PBKS vs RR: बटलरला चांगला सूर गवसला होता. पण तो कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर कुठला फटका खेळला ठाऊक नाही. पण खूप विचित्र पद्धतीने बाद झाला.
मुंबई: वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 52 वा सामना सुरु आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमने-सामने आहेत. जॉनी बेयरस्टोचं (56) (Jonny Bairstow) अर्धशतक आणि जितेश शर्माची (Jitesh Sharma) नाबाद (38) फटकेबाजी याच्या बळावर पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 189 धावा केल्या. 190 या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात केली आहे. जोस बटलर (Jos buttler) आणि यशस्वी जैस्वाल ही राजस्थानची सलामीची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. जोस बटलरने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली होती. चार षटकातच धावफलकावर 46 धावा लावल्या होत्या. बटलर आणि यशस्वी दोघे चांगली फलंदाजी करत होते.
पण चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही
बटलरला चांगला सूर गवसला होता. पण तो कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर कुठला फटका खेळला ठाऊक नाही. पण खूप विचित्र पद्धतीने बाद झाला. तो स्कूप खेळायला गेला. पण चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही. चेंडू बॅटच्या वरती लागला व मागे उभ्या असलेल्या भानुका राजपक्षेने कुठलीही चूक न करता हा झेल घेतला. बटलरने 16 चेंडूत 30 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. जोस बटलर यंदाच्या सीजनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत तीन शतकं ठोकली आहेत.
जोस बटलर कुठला शॉट खेळायला गेला, OUT कसा झाला? इथे क्लिक करुन एकदा हा Video बघा
प्लेऑफच्या दृष्टीने विजय आवश्यक
त्याला बाद करणं प्रतिस्पर्धी संघांसाठी आव्हान असतं. बटलर एकदा खेळपट्टीवर टिकला की, राजस्थानच्या सहज धावा होतात. आयपीएल पॉइंटस टेबलमध्ये राजस्थानचा संघ सध्या 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यात सहा विजय आणि चार पराभव आहेत. पंजाब किंग्स सातव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या दृष्टीने पंजाबसाठी आजचा विजय महत्त्वाचा आहे. राजस्थान आजचा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकेल. प्लेऑफमध्ये स्थान पक्क करण्यासाठी राजस्थानला अजून तीन विजय आवश्यक आहेत.